NCP Leader Jayant Patil
NCP Leader Jayant Patil File Photo
देश

निवडणुका झाल्या की इंधन दरवाढ ठरलेलीच; जयंत पाटील भाजपवर बरसले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर (fuel rates) नियंत्रणात ठेवले जातात. निवडणुका (election) संपल्यावर दरवाढ ही ठरलेलीच. हे काय वित्त नियोजन (financial planning) आहे का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज (बुधवार) इंधनाच्या दरवाढीवरून उपस्थित केला आहे. मंत्री पाटील यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर जाेरदार टीका केली आहे. (jayant patil questions narendra modi government petrol diesel price hike)

देश सध्या कोरोनाच्या संकटात सापडला आहे. विविध राज्य या संकटातून मार्गक्रमण करीत आहेत. त्यात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक संकटास सामाेरे जावे लागत आहे. याच पार्श्वभुमीवर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे तीव्र शब्दांत केंद्र सरकारच्या काराभरावर नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 92 रुपये 5 पैसे आणि डिझेलची किंमत 82 रुपये 61 पैसे प्रति लिटर झाली आहे.

महाराष्ट्रातही पेट्राेल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात स्थिर असलेले इंधनाचे दर निकालानंतर सात दिवसांपासून सतत वाढत आहे. पेट्रोलची वाटचाल शंभरीच्या दिशेने सुरू झाली आहे. चार मेपासून सलग सात दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलचा दर हा ९८.२४ पैसे आणि डिझेल दर ८८.२९ पैसे प्रतिलिटर झाले आहे. परभणीत सर्वाधिक पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे.

परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100 रुपये 75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केली जात आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 98 रुपये 36 पैसे प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89 रुपये 75 पैसे प्रति लिटरवर पोहोचल्याचे जयंत पाटील यांनी नमूद केले. केंद्रीय अर्थ मंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा, असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Marathi News Live Update: पुण्यात वाऱ्यासह हलक्या पावसाला सुरूवात

Space Tourist :  भारतीय वंशाचे गोपीचंद रचणार इतिहास, सायंकाळी सात वाजता आकाशात झेपावणार अंतराळयान

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का! अर्शदीपने उडवला ट्रेविस हेडचा त्रिफळा

SCROLL FOR NEXT