JEE ADVANCE 
देश

जेईई ऍडव्हान्स पुन्हा होण्याची शक्‍यता; आयआयटी प्रवेशाची तिसरी संधी?

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - अभियांत्रिकी, विशेषतः आयआयटीमधील प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यावर्षी कोविड महामारीमुळे जे विद्यार्थी परीक्षाच देऊ शकले नाहीत किंवा गुणवत्तेच्या कसोटीवर पात्र ठरले नाहीत त्यांना आणखी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेऊन तिसऱ्या वेळेस आणखी एक संधी देण्याचा विचार केंद्रीय शिक्षण मंत्रालय गंभीरपणे करत आहे. तसे झाले तर जेईई ॲडव्हान्स परीक्षा पुन्हा घेण्याची आयआयटीच्या इतिहासातील ती पहिली घटना ठरेल.

यासाठी येत्या १३ ऑक्‍टोबरला यूजीसीचे वरिष्ठ तसेच देशातील सर्व म्हणजे २३ आयआयटीच्या संचालकांसह सर्व संबंधितांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडून प्रस्तावित जेईई ॲडव्हान्स परीक्षेबाबतचा निर्णय जाहीर होईल.

शिक्षण मंत्रालयाने १३ ऑक्‍टोबरला संयुक्त प्रवेश मंडळाची (जॅब) बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत जेईई मेन्स व ॲडव्हान्स या पाठोपाठ यंदा तिसऱ्यांदा जेईई परीक्षा देण्याची आणखी एक संधी यावर्षी द्यावी काय, तसेच प्रस्तावित परीक्षेचे स्वरूप काय असावे यावर सविस्तर चर्चा होईल.

आयआयटी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी आतापावेतो जेईईच्या दोन परीक्षा होत असत. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व परीस्थिती उद्भवली आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार करून त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात यावी असा जोरदार मतप्रवाह आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर २०२१ मध्ये जेईई ॲडव्हान्स परीक्षा पुन्हा घेण्यात येईल. कोरोनामुळे ज्यांना पहिल्या दोन्ही परीक्षांमध्ये कमी मार्क मिळाले किंवा जे परीक्षा देऊ शकले नाहीत तेच विद्यार्थी या तिसऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वेदना...'' उद्धव ठाकरेंसमोरच राज ठाकरे बेधडक बोलले

Viral Video : हार्दिक पांड्याचा मॅटर झाला! भारताचा ऑल राऊंडर सामन्यापूर्वी संतापला, बोट दाखवत माजी खेळाडूसोबत सर्वांसमोर भांडला

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन कथित आर्थिक अनियमितता प्रकरणी मोठा दिलासा

IND vs NZ 2nd T20I: भारतीय गोलंदाजांनी फास आवळला! न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी 'चतुराई'ने सापळा रचला; सामना क्षणात फिरला

Salary and Pension Hike : मोदी सरकारचा मोठा निर्णय! आरबीआय, नाबार्ड अन् जनरल विमा कर्मचाऱ्यांच्या पगारात अन् पेन्शनमध्येही वाढ

SCROLL FOR NEXT