Hemant Soren Arrives  
देश

Hemant Soren Arrives : ४० तासांपासून 'नॉट रिचेबल' असलेले झारखंडचे मुखमंत्री हेमंत सोरेन अखेर प्रकटले!

Hemant Soren Arrives : झारखंडचे मुखमंत्री हेमंत सोरेन मंगळवारी तब्बल ४० तासांनंतर रांची येथे पोहचले आहेत. सोरेन अचानक दिल्लीमधून गायब झाले होते.

रोहित कणसे

Hemant Soren Arrives : झारखंडचे मुखमंत्री हेमंत सोरेन मंगळवारी तब्बल ४० तासांनंतर रांची येथे पोहचले आहेत. सोरेन अचानक दिल्लीमधून गायब झाले होते. कथित जमीन घोटाळ्यासंबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून तपास केला जात आहे.

ईडीला हेमंत सोरेन यांची चौकशी करायची असल्याने त्यांना आतापर्यंत १० समन्स जारी करम्यात आले आहेत. दरम्यान आता हेमंत सोरेन यांना अटक होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. यापासून बचालासाठीचे कायदेशीर मार्ग शोधत असलेले सोरेन अचानक गायब झाले होते.

भाजपकडून या प्रकरणी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वातील सरकारवर आरोप केले जात आहेत. इतकेच नाही तर हेमंत सोरेन बेपत्ता असल्याचे पोस्टर्स देखील शेअर करत बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे शनिवारी, २७ जानेवारीला रात्री उशीरा अचानक रांचीहून दिल्लीकडे रवाना झाले होते. एका चार्टर फ्लाईटनं ते दिल्लीला पोहोचले होते.ईडीच्या कारवाईविरोधात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ते दिल्लीला पोहचल्याची चर्चा होती.

दहा वेळा इडीने समन्स पाठवून देखील सोरेन ईडीसमोर हजर झाले नाहीत. दर्मयान सोरेन यांचा संपर्क होत नसल्यानं ईडी पहिल्यांदा सोमवारी त्यांच्या घरी पोहोचली. याठिकाणी तब्बल १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांनी सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT