Petrol Prices  sakal
देश

पेट्रोल तब्बल २५ रुपयांनी स्वस्त, दुचाकीस्वारांना नववर्ष भेट

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशातील नागरिक महागाईचा सामना करत आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. अशातच झारखंड सरकारने (Jharkhand Government) मोठा निर्णय घेतला असून दुचाकी चालकांना नववर्षांची भेट दिली आहे. आता दुचाकी चालकांना पेट्रोलच्या दरात मोठा दिलासा मिळणार आहे.

दुचाकी चालकांना पेट्रोलवर २५ रुपये सवलत देण्याचा मोठा निर्णय झारखंड सरकारने घेतला असून याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज घोषणा केली आहे. या योजनेची २६ जानेवारी २०२२ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

का देण्यात आली सवलत? -

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे गोर-गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे झारखंड सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला फायदा मिळावा या हेतूने ही योजना आणली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ हा गरीब जनतेला देण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात अशी सवलत कधी? -

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून काही प्रमाणात का होईना जनतेला दिलासा देण्याचं काम केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक, गोवा, छत्तीसगडसह अनेक राज्यांनी इंधनावरील कर कमी करून त्यांच्या राज्यातील जनतेला आणखी दिलासा दिला होता. त्याचवेळी महाराष्ट्रात देखील इंधनावरील दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, खुद्द सरकारमधील मंत्र्यांनीच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. इतर सरकारने इंधनावरील कर कमी केल्यानंतर महाराष्ट्र सरकार कशाची वाट पाहतंय? असा प्रश्न देखील वारंवार विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT