Sahibganj Rabita pahadin Murder Case  
देश

प्रेमाचा करुण अंत! लोखंड कापयच्या यंत्रांनं पत्नीचे पन्नास तुकडे; पोलिसांनी सांगितलं कारण

सकाळ डिजिटल टीम

Sahibganj Rubika Murder Case : झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी (17 डिसेंबर) दिलदार अन्सारी नावाच्या व्यक्तीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख पटली असून तिचे नाव रूबिका पहारिया (वय 22) असल्याचे समोर आले आहे. साहिबगंजमधील बोरीओ संथाली भागातील अंगणवाडी केंद्राच्या मागे पीडितेच्या मृतदेहाचे 12 तुकडे आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली होती.

शनिवारी सायंकाळी अंगणवाडी केंद्राच्या पाठीमागे एका व्यक्तीने महिलेच्या पायाचे व छातीचे कापलेले तुकडे कुत्री खात असताना पाहिल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पती दिलदार अन्सारी याला अटक केली आहे. आता ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांचे वक्तव्यही समोर आले आहे. दिलदारने ही हत्या का केली? याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे.

पोलिसांनी सांगितले हत्येचे कारण

डीआयजी सुदर्शन प्रसाद मंडल यांनी सांगितले की, रुबिका ही दिलदार अन्सारीची दुसरी पत्नी होती, त्याला आधीच एक पत्नी होती. यावरून त्यांचा वाद झाला. यामुळे त्यांनी तिची हत्या करून त्याचे तुकडे केले. तपासात तिच्या पतीचा सहभाग समोर आला आहे.

हत्येनंतर मृतदेहाचे 50 हून अधिक तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी आतापर्यंत 12 तुकडे जप्त केले आहेत. दिलदार अन्सारी याने दीड महिन्यापूर्वी रुबिकासोबत दुसरे लग्न केले होते. हे जोडपे 2 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एवढेच नाही तर दोन दिवसांपूर्वी दिलदारने बोरीओ पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दिली होती.

काय आहे प्रकरण?

साहिबगंज येथील दिलदार अन्सारी याच्यावर आपली 22 वर्षीय पत्नी रुबिका पहाडी हिचे कटरने बारा तुकडे केल्याचा आरोप आहे. मयत रुबिका पहाडी ही पती दिलदार अन्सारीसोबत बेलटोला येथे प्रेमविवाह करून राहात होती. लग्नानंतर काही दिवसांनीच दिलदारचे पत्नीशी भांडण सुरू झाल्याचा आरोप आहे. अखेर भांडणाला कंटाळून त्याने धोकादायक प्लॅन केला आणि नंतर पत्नीची हत्या करून इलेक्ट्रिक कटरने तिच्या मृतदेहाचे 12 तुकडे केले. त्यानंतर अंगणवाडी केंद्राच्या मागे फेकले.

कुत्रे शरीराचे भाग ओढत होते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता बोरियो पोलीस स्टेशन हद्दीतील संथाली मोमीन टोला येथे असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या मागे 12 तुकड्यांमध्ये महिलेचा विकृत मृतदेह सापडला. शरीराचा छिन्नविछिन्न भाग कुत्रे ओढत असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांचा ताफा मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाला. यावेळी श्वानपथकही त्यांच्यासोबत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: रुग्णालयातूनच रणनिती आखली, आजारी असूनही राजकारणावर पकड केली; उमेदवाराला जिंकवून भुजबळांनी ताकद दाखवली!

Red Christmas Dress for Woman: स्टाइल आणि एलिगन्सचा परफेक्ट कॉम्बो! Christmas पार्टीसाठी बेस्ट रेड आउटफिट्स

Black Coffee Benefits: ब्लॅक कॉफी हृदयासाठी फायदेशीर की धोकादायक? वाचा याचे योग्य उत्तर

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष, आम्ही जनतेचे आभार मानतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मामेभावाशी बळजबरीनं लग्न लावून दिलं, पुन्हा पुन्हा अत्याचार; हाजी मस्तानच्या मुलीची न्यायासाठी मोदी-शहांकडे विनवणी

SCROLL FOR NEXT