YouTube Video eSakal
देश

YouTube Video : दातदुखीसाठी यूट्यूब व्हिडिओ पाहून स्वतःच इलाज करणं बेतलं जीवावर; २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रुग्णालयात नेण्यापूर्वीच या तरुणाने आपले प्राण सोडले होते.

Sudesh

बऱ्याच वेळा आपण छोट्या-मोठ्या दुखण्यांसाठी डॉक्टरकडे न जाता गुगल किंवा यूट्यूबची मदत घेतो. आरोग्याच्या बाबतीत अशा निष्काळजीपणा न करण्याचे आवाहन डॉक्टर वेळोवेळी करत असतात. मात्र, कित्येक लोक याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अशाच प्रकारे यूट्यूबवर दातदुखीचा इलाज शोधणं एका तरुणाला भलतंच महागात पडलं आहे.

दात दुखतोय म्हणून एका तरुणाने यूट्यूबवर सांगितलेला इलाज करून पाहिला. मात्र, यामुळे या तरुणाची तब्येत आणखी खालावली. अखेर त्याला रुग्णालयात न्यावे लागले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अजय महतो असं या तरुणाचं नाव आहे. २६ वर्षांचा हा तरुण झारखंडमध्ये राहत होता.

दातदुखीसाठी खाल्लं कन्हेरीचं बी

दातदुखी थांबवण्यासाठी अजय यूट्यूबवर घरगुती उपाय शोधत होता. यानंतर त्याने यूट्यूबवरील एक व्हिडिओ पाहून कन्हेरीच्या बियांचं सेवन केलं होतं. यामुळेच त्याची तब्येत खालावली, आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं; अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.

कन्हेरीच्या बिया आपल्या आरोग्यासाठी भरपूर घातक असतात. तसंच, यांच्या अति सेवनाने मृत्यूही होऊ शकतो, अशी माहिती हजारीबागचे सिव्हिल चिकित्सक एसपी सिंह यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. अजयच्या प्रकरणाबाबत बोलताना, "रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला होता" असं ते म्हणाले.

यूट्यूबवरील चॅलेंज धोकादायक

यूट्यूब आणि सोशल मीडियावर कित्येक प्रकारचे चॅलेंज व्हायरल होत असतात. यांमध्ये सहभागी होऊन, दुसऱ्यांचं अनुकरण केल्यामुळे आतापर्यंत कित्येकांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील ओहायो राज्यातील एका १३ वर्षीय मुलाचाही 'बेनाड्रिल चॅलेंज'मुळे बळी गेला. यासाठी त्याने या खोकल्याच्या औषधाच्या १२ ते १४ स्ट्राँग गोळ्या एकाच वेळी घेतल्या होत्या. यामुळे या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT