Jitan Ram Manjhi Nitish Kumar esakal
देश

Jitan Ram Manjhi : ''मला दरवेळी तेच मंत्रालय का?'' नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात नाराजी, पडद्यामागील घडामोडींना वेग

नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून एनडीएसोबत घरोबा केला आहे. त्यांच्या नवीन सरकारमध्ये नाराजी दिसून येतेय. नवीन सरकारमध्ये किंगमेकर ठरलेले जीतनराम मांझी यांनी त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मंत्रिपदावरुन जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे.

संतोष कानडे

Nitish Kumar Bihar Government : नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून एनडीएसोबत घरोबा केला आहे. त्यांच्या नवीन सरकारमध्ये नाराजी दिसून येतेय. नवीन सरकारमध्ये किंगमेकर ठरलेले जीतनराम मांझी यांनी त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मंत्रिपदावरुन जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे.

मांझी यांनी सोमवारी सार्वजनिक कार्यक्रमामधून मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं. त्यांचं म्हणणं आहे की, दरवेळी आमच्या पक्षाला (HAM) एखादं मोठं मंत्रालय का दिलं जात नाही. ''जेव्हा मी मंत्री होतो तेव्हासुद्धा एससी, एसटी मंत्रालय दिलं गेलं होतं आणि आता मुलगा संतोष यांनाही हाच विभाग दिला.''

२८ जानेवारी रोजी बिहारमध्ये सत्ताबदल झाला. नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपच्या कोट्यातून दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. यामध्ये सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांचा समावेश आहे. यांच्यासह आणखी पाच जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

जीतनराम मांझी यांच्या HAM कोट्यातून संतोष सुमन यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिपदाचं वाटप झालं तेव्हा नितीश कुमारांनी स्वतःकडे गृहमंत्रीपद ठेवलं. त्याशिवाय सामान्य प्रशासन, मंत्रिमंडळ सचिवालय, निवडणूक हे विभाग अद्याप कुणालाही दिलेले नाहीत.

सम्राट यांना अर्थ, वाणिज्य कर, नगरविकास, कृषी, रस्ते विकास, भूविकास, ऊस उद्योग, सांस्कृतिक या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर जीतनराम मांझी यांचा सुपुत्र संतोषकुमार सुमर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती कल्याण ही खाती देण्यात आलेली आहेत.

सोमवारी जाहीर कार्यक्रमात बोलताना जीतनराम मांझी म्हणाले की, मी मंत्री होतो तेव्हासुद्धा मला हेच खातं देण्यात आलेलं होतं आणि आता माझ्या मुलालही हाच विभाग मिळाला आहे. आम्ही रस्ते विकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळू शकत नाहीत का?

दुसरीकडे काँग्रेसकडून जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून ही ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या होत्या. त्यानंतर जीतनराम मांझी यांनी आणखी दोन मंत्रिपदं मागितली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Latest Marathi News Updates : पुलावरून वाहत्या पाण्यातून तहसीलदारांनी टाकली गाडी

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

SCROLL FOR NEXT