jitendra awhad tweet sachin tendulkar virat kohli over Wrestlers Protest brijbhushan singh women wrestlers row  
देश

Wrestlers Protest : तेंडुलकर, कोहली काही बोलतील का…; ब्रिजभूषण सिंह प्रकरणी राष्ट्रवादी नेत्याचं ट्वीट

रोहित कणसे

भाजप खासदार आणि ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केले आहेत.बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीत खेळाडू आंदोलन करत आहेत. त्यांना क्रिडा जगतातील अनेक खेळाडूंकडून पाठिंबा मिळत आहे.

अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल ट्वीट केलं आहे. अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले. पण सरकार खा. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही.

तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच बातमी आली . कपिलदेव ह्या भगिनीन साठी उभा राहिला.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशातील दिग्गज कुस्तीपटू दिल्लीत धरणे दिले आहे. त्यांच्या या लढ्याला अनेक राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे, मात्र आतापर्यंत त्यांच्या समर्थनार्थ दुसरा कोणीही खेळाडू पुढे आला नाही. यावर आता विनेश फोगट यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विनेशने भारतीय क्रिकेटपटू आणि इतर आघाडीच्या खेळाडूंच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. संपूर्ण देश क्रिकेटची पूजा करतो, मात्र एकाही क्रिकेटरने या प्रकरणावर भाष्य केलं नाहीये असे ती म्हणाली आहे.

निरज चोप्रा काय म्हणाला?

आता कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राची देखील साथ मिळाली आहे. नीरज चोप्राने पैलवानांच्या समर्थनार्थ ट्विट केले की, तो म्हणाला की, "ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला वेदना होत आहेत. त्यांनी आमच्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आम्हाला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगले काम केले आहे."

"एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT