Crime FB Live 
देश

Crime on FB Live: जमिनीच्या वादातून वृद्ध शेजाऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव; क्रूरतेचं केलं फेसबुक लाईव्ह!

आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

श्रीनगर : जमिनीच्या वादातून एका वृद्ध शेजाऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. तसेच या क्रूर कृत्याचं त्यानं फेसबुकवरुन लाईव्ह स्ट्रिमिंगही केलं. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीला काही तासांतच अटक केली. (J&K crime Doda man livestreams axing neighbor to death over land Dispute on Facebook)

जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील गंडोह तालुक्यातल्या चौनरी गावात हा भयानक प्रकार घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भैरव सिंग (वय ३१) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्यानं राम कृष्णन (वय ५६) या व्यक्तीची शुक्रवारी गंडोह परिसरात कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केली. (Latest Marathi News)

ही घटना घडली तेव्हा राम कृष्णन हे आपली नात आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत होते. कुर्हाडीचे घाव घालत या क्रूर हत्येचं फेसबुक लाईव्ह सुरु असताना लहान मुलाचा मोठ्यानं रडण्याचा आवाजही ऐकू येत होता. पीडित व्यक्तीला वाचवताना त्या चिमुकल्याची आई अंजू देवीही जखमी झाली. तिला उपचारासाठी दोडा इथल्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

प्रथमदर्शनी ही घटना दोन कुटुंबांतील जमिनीच्या वादातून घडल्याचे दिसते. दोडा पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, वादग्रस्त जमिनीतून दगड काढण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद झाला. त्याची परिणीती पुढे हत्येच्या घटनेत झाली.

पण घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला पकडलं. आरोपी जवळच्या जंगल परिसरातून लपून बसला होता. या प्रकरणी आरोपी भैरव सिंह याच्यावर कलम 302, 307 आणि 342 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT