Parvez Ahemad Dar (J&K Police) 
देश

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद

नमाज पठण करुन घरी परतत असताना पोलिसावर झाला हल्ला

Amit Ujagare (अमित उजागरे)

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यात बागात कनीपोरा भागात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. शहीद पोलीस निरिक्षक परवीझ अहमद दार (Parvez Ahemad Dar) हे काउंटर इंटिलिजन्स काश्मीरमध्ये तैनात होते. (J&K police officer shot by terrorists in Srinagar, succumbs on way to hospital)

पोलिसांच्या माहितीनुसार, बागात नौगाम भागात पोलीस निरीक्षक परवेझ अहमद दार हे नमाज पठण करुन घरी परतत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात दार हे गंभीररित्या जखमी झाले. यानंतर रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या दार यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषीत केलं.

या घटेनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत घटनेची माहिती घेतली. जवळच्या भागात शोध मोहिम राबवली. या परिसरात लावलेले सीसीटीव्ही आणि कॅमेऱ्यांतील फुटेजची तपासणी करण्यात आली.

दहशतवादी संघटना 'द रिजिस्टंस फ्रन्ट'ने घेतली जबाबदारी

या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टंस फ्रन्टने (टीआरएफ) घेतली आहे. या संघटनेने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, टार्गेट किलिंग होतं. तसेच त्यांनी तरुणांना त्रास देणाऱ्या पोलिसांनाही इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT