Argument in JNU and ABVP leaders Argument in JNU and ABVP leaders
देश

डावे आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये वाद : रामनवमीवरून एकमेकांवर आरोप

सकाळ डिजिटल टीम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी मांसाहारापासून रोखल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) (JNU) डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी कावेरी वसतिगृहाच्या मेसच्या सचिवाला मारहाण केल्याचा आरोपही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. (Argument in JNU and ABVP leaders)

एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर जेएनयू कॅम्पसमध्ये गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या पूजेला परवानगी देत ​​नसल्याचा आरोप एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या जेएनयू (JNU) कॅम्पसमध्ये या प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे.

एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी द्वेषपूर्ण राजकारणामुळे आणि फुटीरतावादी अजेंड्यामुळे कावेरी वसतिगृहात हिंसक वातावरण निर्माण केले आहे. ते मेस समितीला जेवणाचा मेनू बदलण्यास भाग पाडत आहेत. मेसशी संबंधित असलेल्यांसह डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करीत आहेत. या मेनूमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीचे कोणतेही पदार्थ घेऊ शकतात. मात्र, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करीत गोंधळ घातला. मेसच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. अभाविपच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मेस कर्मचाऱ्यांवर मांसाहार तयार करू नये म्हणून दबाव आणला, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

हे तर उजव्या हिंदुत्वाच्या धोरणांचे प्रतिबिंब

जेएनयू आणि तेथील वसतिगृहे सर्वांसाठी समान असल्याचे विद्यार्थी संघटनेकडून सांगण्यात आले आहे. येथे राहणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या भागातील असून त्यांची संस्कृती, खाणेपिणे वेगळे आहे. ज्याचा आदर करायला हवा. एबीव्हीपीचे (ABVP) हे पाऊल जेएनयू सारख्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष ठिकाणी वर्चस्वाचे राजकारण आणि उजव्या हिंदुत्वाच्या धोरणांचे प्रतिबिंब आहे असा आरोप करण्यात आला.

फुटीरतावादी कारवायांपुढे झुकणार नाही

जेएनयू (JNU) विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांना सांप्रदायिक शक्तींविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. अशा कोणत्याही फुटीरतावादी शक्तींचा खंबीरपणे सामना केला पाहिजे आणि जेएनयू समुदायाने एकजुटीने पुनरुच्चार केला पाहिजे की अशा कोणत्याही कृत्याविरुद्ध शून्य सहनशीलता असेल. जेएनयूचे विद्यार्थी अशा फुटीरतावादी कारवायांपुढे झुकणार नाही. तसेच अशा घटनांविरोधात लढा देत राहतील, असे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT