jnu attack suspected student leader aishi ghosh raised five points 
देश

JNU Attack: पोलिसांनी डाव्यांवरच ठेवला ठपका; आईशी घोषसह नऊ जणांची नावे जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यापीठातील हिंसाचारामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या ठाकलेल्या दिल्ली पोलिसांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या प्रकरणी नऊ संशयितांची ओळख पटविताना त्यांनी "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोषवर हिंसाचाराचा ठपका ठेवल्याने नव्या वादाला तोंड फुटू शकते.

दिल्ली पोलिसांनी आज संशयितांची सीसीटीव्ही छायाचित्रे माध्यमांसमोर मांडली. यामध्ये "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासह चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, वासकर विजय, सुचेता तालुकराज, प्रिया रंजन, दोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा समावेश आहे. हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आईषी घोषचे दावे 

  • मी काहीही चुकीचे केलेले नसून, पोलिसांना घाबरत नाही  
  • कायद्याच्या बाजूने आम्ही ठाम, लोकशाही मार्गाने चळवळ पुढे नेऊ 
  • पोलिसांनी माझ्याविरोधातील पुरावे सार्वजनिक करावेत 
  • माझ्यावरील हल्ल्याचे पुरावे मी सादर करू शकते 
  • मी कोणावरही हल्ला केलेला नसून, पोलिसांचे आरोप खोटे 

सरकार नरमले
हिंसाचारानंतर केंद्र सरकारने अखेर आज नमते घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या सचिवांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क न घेण्यावर, तसेच हिवाळी सत्राच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यावर सहमती झाली आहे. दरम्यान, विद्यार्थी मात्र कुलगुरू हटाओच्या मागणीवर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण सचिव अमित खरे यांनी कुलगुरू एम. जगदीशकुमार यांना बोलावून घेत, तसेच जेएनयूतील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. यात "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोष हिचाही समावेश होता. या भेटीनंतर कुलगुरू जगदीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना विद्यापीठात स्थिती सुधारल्याचा दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरच्या पोलिस अधीक्षकांची मोठी कारवाई! करमाळा व माढा तालुक्यातील ‘हे’ १७ सराईत गुन्हेगार हद्दपार, वाळू तस्करीसह गंभीर गुन्हे दाखल होते, वाचा....

Pachod Accident : दुचाकीची बैलगाडीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

YouTube वर आता Views चा खेळ बदलणार! २४ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, नेमका काय झालाय बदल?

Ganesh Bidkar : राष्ट्रवादीशी मैत्री राज्यात, पुण्यात नाही! अमोल बालवडकर यांचा निधी केला शून्य

Raksha Bandhan 2026: यंदा रक्षाबंधन नेमकं कधी? 27 की 28? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त; चंद्रग्रहणाचं काय?

SCROLL FOR NEXT