JNU esakal
देश

JNU: ...तर रक्तपात होणार! भितींवर ब्राह्मण विरोधी नारा

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. देशात रक्तपात होणार असल्याचे बोलले जात आहे. जेएनयू कॅम्पसमधील अनेक इमारतींवर ब्राह्मण आणि बनियाविरोधी नारा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीदेखेली देण्यात आली आहे. (JNU On Anti-Brahmin Slogans On Walls)

मिळालेल्या माहितीनुसार, जेएनयु विश्वविद्यालयाच्या इमारतीवर ब्राह्मण आणि बनियांच्या विरोधात जातीयवादी घोषणा लिहिल्यानंतर चांगलाच गोंधळ झाला आहे. तसेच, भिंतींवर ब्राह्मण आणि बनिया समाजाने निघून जावे, अन्य़ता रक्तपात होईल अशी धमकीदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली येथे पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं भिंतीवर काय लिहिलं आहे?

'ब्राह्मण आणि बनिया परिसर सोडा', 'आम्ही तुमच्यासाठी येत आहोत', 'शाखेत परत जा', 'आम्ही बदला घेऊ', 'रक्तपात होणार' अशा काही घोषणा सर्व भिंती आणि दरवाजांवर लिहिण्यात आल्या आहेत. या फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेएनयू टीचर्स फोरमने ट्विटरवर काही फोटोही शेअर केले आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर शांतीश्री डी पंडित यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. 'कॅम्पसमधील अशा फुटीरतावादी कारवाया अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत, जेएनयू सर्वांचे आहे.

जेएनयू टीचर्स फोरमनेही याविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (SIS) चे डीन आणि तक्रार समितीला तपास पूर्ण करून लवकरात लवकर अहवाल सादर करा' असा आदेशही कुलगुरू प्रोफेसर शांतीश्री डी पंडित यांनी दिला आहे.

सुप्रीम कोर्टात वकील असलेले विनीत जिंदाल यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. आयपीसीच्या कलम 153A/B, 505, 506, 34 अंतर्गत अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी दिल्ली पोलिसांना करण्यात आली आहे. जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT