SFI activists staging a loud protest at JNU in New Delhi against Maharashtra CM Devendra Fadnavis amid rising student unrest.  esakal
देश

SFI protest against Fadnavis: 'JNU'मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात 'SFI'कडून जोरदार घोषणाबाजी!

SFI JNU protest: याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री उदय सामंत यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.

Mayur Ratnaparkhe

SFI Launches Protest at JNU Against Devendra Fadnavis:छत्रपती शिवाजी महाराज सामारिक अध्यासन केंद्राचं भूमिपूजन आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्ययन केंद्राचं उद्घाटन आज(गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी दिल्लीतील जेएनयूमध्ये पार पडत आहे. मात्र याप्रसंगी एक स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याचे समोर आले.

नवी दिल्लीच्या जेएनयूमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज सामारिक अध्यासन केंद्राचं भूमिपूजन आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्धाटन होत आहे. मात्र या सोहळ्याला एसएफआय विद्यार्थी संघटनेकडून विरोध केला गेला आहे.

महाराष्ट्रात विशेषकरून मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनेकडून हे आक्रमक पाऊल उचलण्यात आल्याचं समोर आले आहे. अनेक आंदोलकांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया देत, फडणवीसांना विरोध केला आहे.

तर, मुख्यमंत्री फडणवीस आज जेएनयूमध्ये येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच एसएफआय संघटनेकडून याला विरोध दर्शवत आक्रमक भूमिका दर्शवली होती. यानंतर जेव्हा फडणवीसांचे जेएनएयू कॅम्पसमध्ये आगमन झाले, तेव्हा या संघटनेकडून घोषणाबाजी सुरू झाली.

आरएएस, हिंदुत्व डाउन डाउन, देवेंद्र फडणवीस गो बॅक ... अशा घोषणा दिल्या जात होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा यासाठी विरोध करत आहोत, कारण ते जनविरोधी धोरणं आणत आहेत. संविधानाच्या बळावर आम्ही हे आंदोलन करत आहोत, असंही आंदोलकांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT