Joshimath 
देश

Joshimath : इस्रोने घेतला अहवाल मागे, मोदी सरकारने तज्ज्ञ संस्थांना...

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडमध्ये जमीन खचल्याने स्थानिक लोकांच्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याबाबत जोशीमठ दुर्घटनेबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अहवाल सादर केला होता. या अहवालात इस्रोने चिंता वाढवणारी माहिती दिली होती. जोशीमठमध्ये भूस्खलनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. (joshimath land subsidence isro pulls down report)

१२ दिवसांत जमीन ५ सें.मी. जोशीमठ भूस्खलनाबाबत फोटोसहीत इस्रोने अहवाल सादर केला होता. दरम्यान केंद्र सरकारने हा अहवाल  वेबसाइटवर हटवण्यास सांगितले. सरकारने तज्ज्ञ संस्थांना माध्यमांशी न बोलण्याचे निर्देश दिले आहेत. 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सरकारी संस्था आणि वैज्ञानिक संस्थांना उत्तराखंडमधील जोशीमठ येथील भूस्खलनाबाबत मीडियाशी संवाद साधू नये किंवा सोशल मीडियावर डेटा शेअर करू नये, असे निर्देश दिले आहेत.

इस्रो आणि अन्य संस्थांच्या अहवालामुळे केवळ बाधित रहिवाशांमध्येच नाही तर देशातील नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने शुक्रवारी जारी केलेल्या प्राथमिक अहवालात जोशीमठच्या काही भागांमध्ये वेगाने भूस्खलन झाल्याचे दिसून आले आहे. इस्रोने उपग्रहातून काढलेली छायाचित्रेही प्रसिद्ध केली होती. दरम्यान हे अहवाल NRSC वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT