ED
ED 
देश

पत्रकारानं चीनला पुरवली संवेदनशील माहिती; ईडीकडून अटक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतातील एका मुक्त पत्रकारानं देशासंबंधीची गोपनिय आणि संवेदनशील माहिती चीनी गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अर्थान ईडीनं त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. पैशांच्या मोबदल्यात हे कारस्थान केल्याचा आरोप या पत्रकारावर आहे. ईडीनं एक पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. (Journalist provides sensitive information about India to China for money arrested by ED)

राजीव शर्मा असं या मुक्त पत्रकाराचं नाव असून त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने १ जुलै २०२१ रोजी अटक केली आहे. भारतातील गोपनिय आणि संवेदनशील माहिती चीनी गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवल्याचा ईडीचा आरोप आहे. अटकेनंतर शर्मा याला २ जुलै रोजी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टानं पुढील चौकशीसाठी त्याला सात दिवसांची कोठडी सुनावली.

पैशांच्या हव्यासापोटी देशाच्या सुरक्षेशी केली तडजोड

राजीव शर्मा याच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, एफआयआर आणि त्याच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, ईडीने याप्रकरणी तपास सुरु केला आहे. या तपासादरम्यान, उघड झालं की मुक्त पत्रकार असलेला राजीव शर्मा भारतासंबंधीची गोपनिय आणि संवेदनशील माहिती पैशांच्या मोबदल्यात चीनी अधिकाऱ्यांना पुरवत होता. पैशांच्या हव्यासापोटी त्यानं देशाची सुरक्षेशी तडजोड केल्याचंही ईडीनं म्हटलं आहे.

हवालामार्फत चालत होता पैशांचा व्यवहार

ईडीच्या तपासात हे देखील उघड झालं की, राजीव शर्मा आणि इतर अज्ञात व्यक्तींना चीनी अधिकाऱ्यांकडून मिळणारे पैसे हे हवाला नेटवर्कमार्फत दिले जात होते. महिपालपूर येथील एक बनावट कंपनी चीनी नागरिक असलेल्या झांग चेंग याने सूरज या नावाने, झांग लिक्झिया ही महिला उषा या नावानं तर क्विंग शी या चीनी नागरिकानं एक नेपाळी नागरिक शेर सिंग याच्यासोबत राज बोहरा नावानं चालवत होते.

चीनी कंपन्यांबरोबर आर्थिक व्यवहार

याप्रकरणी मोठ्या प्रमाणावर चीनी कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार झाले आहेत. तसेच भारतातील काही कंपन्याचीही याप्रकरणी चौकशी केली जात आहे. राजीव शर्मा आणि इतर लोकांसोबत व्यवहार होत असलेल्या चीनी कंपन्या चीनी गुप्तचर यंत्रणांसाठी काम करत आहेत. दरम्यान, राजीव शर्मा याला विविध बेनामी बँक अकाउंट्समधून पैसा मिळाला आहे, असंही चौकशीतून समोर आल्याचं ईडीनं म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचंही ईडीनं सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT