Journalist Ravish Kumar Wins 2019 Ramon Magsaysay Award
Journalist Ravish Kumar Wins 2019 Ramon Magsaysay Award 
देश

मोदींविरोधात भूमिका घेणारे‌ पत्रकार रवीश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज मिळवून देणाऱ्या निर्भीड पत्रकारितेबद्दल 2019चा "रॅमन मॅगसेसे पुरस्कार' प्रसिद्ध भारतीय पत्रकार रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना नीलापजित, फिलिपिन्समधील संगीतकार रेमुंडो पुजांते कायाबयाब आणि दक्षिण कोरियामध्ये तरुणांमधील हिंसा आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते किम जोंग-की यांना यंदाच्या "रॅमन मॅगसेसे पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे. 

आशियातील नोबेल मानल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे 9 सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण होईल. यंदा हा पुरस्कार पाच जणांना देण्यात येणार असून, त्या रवीश कुमार हे एकमेव भारतीय आहेत. 

एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक असलेले 44 वर्षीय रवीश कुमार यांचा भारतातील सर्वांधिक प्रभावशाली पत्रकारांमध्ये समावेश होतो, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. आपल्या "प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे सर्वसामान्यांच्या दुर्लक्षित प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम ते करतात. ज्यांचा आवाज दाबला जातो, अशा घटकांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोचविण्याचे काम रवीश कुमार यांची पत्रकारिता करते. लोकांचा आवाज बनणे हीच पत्रकारिता आहे, अशा शब्दांत पुरस्कार निवड समितीने रवीश कुमार यांचा गौरव केला आहे. 

सत्याचे रक्षण करण्यासाठीचे धैर्य, उच्च दर्जाची नैतिक पत्रकारिता ही रवीश कुमार यांची वैशिष्ट्ये आहेत. आवाज नसलेल्यांचे प्रश्न अतिशय संयमीतपणे मांडत, सत्तेला जाब विचारणारी त्यांची पत्रकारिता लोकशाहीला बळकट करणारी आहे, त्यामुळे म्हणून रवीश कुमार यांची या पुरस्कारासाठी निवड करताना आम्हाला आनंद होतो, असेही पुरस्कार प्रदान करणाऱ्या मंडळाने म्हटले आहे. 

फिलिपिन्सचे तिसरे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1957 पासून दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. निःस्वार्थ सेवा आणि परिवर्तनशील कार्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराने गौरविले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT