journalist shot front of daughter at up video viral 
देश

Video: पत्रकारावर मुलीसमोरच झाडल्या गोळ्या...

वृत्तसंस्था

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): एका पत्रकाराला बेदम मारहाण करून गोळ्या झाडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पत्रकाराच्या मुलीसमोरच ही घटना घडल्यामुळे मुलगी प्रचंड घाबरून आरडाओरड करताना दिसत आहे. विक्रम जोशी असे या पत्रकाराचे नाव असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

गाझियाबादच्या विजयनगर भागातून विक्रम जोशी आपल्या दुचाकीवरून मुलीसोबत प्रवास करत होते. यावेळी काही गुंडांनी मागून येऊन त्यांना घेरले. जोशी यांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. हा सगळा प्रकार जोशी यांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जोशी यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जोशी यांनी आपल्या भाचीसोबत झालेल्या छेडछाडीची पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला असावा असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT