Dhiraj Sahu esakal
देश

Dhiraj Sahu : ''हे पैसे कोणाचे?'' काँग्रेस खासदाराकडे घबाड सापडल्यानंतर नड्डांचा प्रश्न

प्राप्तिकर खात्याने झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये घातलेल्या छाप्यांत तीनशे कोटी रुपये सापडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः झारखंडमध्ये पैशांचे घबाड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हे पैसे कोणाचे, अशी विचारणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच ज्यांच्या घरी हा पैसा सापडला आहे, ते काँग्रेसी खासदार धीरज साहू यांना सोशल मीडियावरुन केली आहे.

प्राप्तिकर खात्याने झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये घातलेल्या छाप्यांत तीनशे कोटी रुपये सापडले आहेत. यावरून भाजपने काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले आहे. ‘बंधू, याचे उत्तर तर द्यावेच लागेल. तुम्हाला (धीरज साहू) आणि तुमचे नेते राहुल गांधी यांनाही’, असे म्हणत भाजपाध्यक्ष नड्डा यांनी टीकास्त्र सोडले आहे.

‘‘हा नवा भारत आहे. येथे राजघराण्याच्या नावावर जनतेचे शोषण करू दिले जाणार नाही. तुम्ही पळून पळून थकून जाल, पण कायदा तुमचा पाठलाग सोडणार नाही. काँग्रेस जर भ्रष्टाचाराची हमी असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईची हमी आहेत. जनतेकडून लुटलेला पैनपै परत द्यावा लागेल,’’ असे नड्डा यांनी सोशल त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ओडिशा आणि झारखंडमधील कर छाप्यांमध्ये काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित कंपनीतून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ८ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला होता.

सोशल मीडियावर पंतप्रधान म्हणतात "देशवासीयांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या नेत्यांचे प्रामाणिकपणाचे 'भाषण' ऐकावे." पंतप्रधान पुढे म्हणतात की जनतेकडून जे काही लुटले गेले आहे, एक एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची हमी आहे.

गुरुवारी आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) वर छापे टाकले. ही कंपनी धीरज साहू यांच्याशी संलग्न आहे. अधिकाऱ्यांनी मोठी रोकड जप्त केली असून छापा अद्यापही सुरूच आहे . मोजणीसाठी वेळ लागत आहे. एका वृत्तानुसार, या छाप्यात ३०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ZIM: हारला तर बाहेर, जिंकला तरी टेन्शन कायम! भारताच्या सामन्यावर WI च्या निकालाची छाया, सेमीफायनलचं भवितव्य ठरणार

Solapur News: साेलापूरात केंद्र सरकार अन्‌ भाजपविरुद्ध काँग्रेसची निदर्शने; राहुल गांधींना धमकी, हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध!

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्राचा 'नो सिग्नल', कारण काय? नव्या मार्गाचा अभ्यास करणार, CM फडणवीसांचं आश्वासन

Latest Marathi News Live Update : दिवाकर रावतेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस होणार बंद

Kolhapur Dead Body News : कोल्हापुरातील मसाई पठारावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला, काही दिवसांपूर्वी सुरू होते चित्रपटाचे चित्रीकरण

SCROLL FOR NEXT