President of India officially appoints Justice Suryakant as the new Chief Justice of India during a formal ceremony at Rashtrapati Bhavan.
esakal
New Chief Justice of India News : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ते २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आणि भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर केली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे २४ नोव्हेंबर रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.
केंद्रीय कायदा आणि न्याय आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी एका एक्स-पोस्टमध्ये लिहिले आहे की, "भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती महोदया, २४ नोव्हेंबर २०२५ पासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करत आहेत. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो."
या वर्षी १४ मे रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेल्या न्यायमूर्ती गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. या शिफारसीनुसार सरकारनेही न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली. २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळालेले न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश म्हणून सुमारे १५ महिने काम करतील. ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.