Justice UU Lalit  esakal
देश

न्यायमूर्ती लळीत बनणार देशाचे नवे सरन्यायाधीश; रमना यांनी केंद्राकडं पाठवली शिफारस

विद्यमान सरन्यायाधीश रमना यांनी न्यायमूर्ती लळीत यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडं पाठवलीय.

सकाळ डिजिटल टीम

विद्यमान सरन्यायाधीश रमना यांनी न्यायमूर्ती लळीत यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडं पाठवलीय.

नवी दिल्ली : न्यायमूर्ती यू यू लळीत (Justice U U Lalit) हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश रमना यांनी न्यायमूर्ती लळीत यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडं (Central Government) पाठवलीय. नियमानुसार, निवृत्त होणारे CJI नवीन CJI च्या नावाची शिफारस करतात. CJI रमना 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.

न्यायमूर्ती लळीत मुस्लिमांमधील 'तिहेरी तलाक' प्रथेला बेकायदेशीर ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांचा भाग आहेत. बार असोसिएशनमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती होणारे ते दुसरे सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती एस. एम. सिक्री हे मार्च 1964 मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती झालेले पहिले वकील होते. जानेवारी 1971 मध्ये ते 13 वे सरन्यायाधीश झाले.

न्यायमूर्ती लळीत हे विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमना 27 ऑगस्ट रोजी निवृत्त झाल्यानंतर, ते भारताचे 49 वे CJI बनणार आहेत. न्यायमूर्ती लळीत यांची 13 ऑगस्ट 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा ते प्रसिद्ध वकील होते. न्यायमूर्ती ललित तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं ऑगस्ट 2017 मध्ये 3-2 अशा बहुमतानं 'तिहेरी तलाक' असंवैधानिक घोषित केला होता. त्या तीन न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती ललित यांचाही समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT