Sarhali Police Station esakal
देश

Sarhali Police : पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यामागं विदेशी दहशतवाद्यांचा हात; DGP कडून मोठा खुलासा

पोलिस स्टेशनवर 9 डिसेंबरच्या रात्री झालेल्या हल्ल्यामागं विदेशी दहशतवाद्यांचा हात असल्याचं समोर आलंय.

सकाळ डिजिटल टीम

पोलिस स्टेशनवर रात्री झालेल्या हल्ल्यामागं विदेशी दहशतवाद्यांचा हात असल्याचं समोर आलंय.

पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यातील सरहाली पोलिस स्टेशनवर (Sarhali Police Station) 9 डिसेंबरच्या रात्री झालेल्या हल्ल्यामागं विदेशी दहशतवाद्यांचा हात असल्याचं समोर आलंय, असं पंजाब डीजीपी गौरव यादव (DGP Punjab Gaurav Yadav) यांनी सांगितलं.

लखबीर सिंग उर्फ लांडा, सतबीर सिंग उर्फ सत्ता आणि गुरदेव उर्फ जैसेल आणि अजमीत सिंग अशी आरोपींची नावं आहेत. सध्या ते तुरुंगात आहेत. रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (Rocket Propelled Grenades) हल्ल्याची योजना आखल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह सहा तरुणांना अटक करण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखबीर सिंग कॅनडामध्ये (Canada) असून सतबीर सत्ता आणि गुरदेव युरोपीय (Europe) देशांमध्ये वास्तव्यास आहेत. गुरदेव नुकताच दुबईतून युरोपमध्ये स्थलांतरित झाला आहे.

चोहला साहिब येथील गुरलाल सिंग उर्फ गहला (19), थथिया महंता गावातील सुरलालपाल सिंग उर्फ गुरलाल (21) आणि जोबनप्रीत सिंग उर्फ जोबान (18), गुरप्रीत सिंग उर्फ गोपी (18) रा. नौशेरा पन्नूआन अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन अल्पवयीनांनी पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता.

सोव्हिएत काळातील कॅलिबर RPG-26 शस्त्र, जे अफगाणिस्तानात मुजाहिदीन वापरत होते. हे शस्त्र सीमेपलीकडून आणलं गेलं होतं. पोलिसांनी अटक केलेल्यांकडून तीन पिस्तुल, दारूगोळा, हातबॉम्ब आणि एक मोटारसायकल जप्त केलीय. तरनतारणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरमीत सिंग चोहान म्हणाले, हा हल्ला गोपी नंबरदार आणि गुरलाल गहला यांनी घडवून आणला होता. हे दोघं लांडा आणि सत्ता यांच्या संपर्कात होते. दोघांना गुरुवारी सरहाली येथून 32 पिस्तुल व 15 जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली. दरम्यान, लांडा आणि सत्ताकडून 8.5 लाख रुपये, पिस्तूल आणि 200 जिवंत काडतुसं मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT