Jyotiraditya Scindia Guna Lok Sabha Result 2024 Esakal
देश

Guna Lok Sabha Result 2024: जोतिरादित्य सिंधियांना पाच लाखांनी विजय, मिळवली विक्रमी मते

Jyotiraditya Scindia: 2014 च्या निवडणुकीत 1 लाख मतांनी विजयी झालेले काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा 2019 मध्ये भाजपच्या डॉ. केपी यादव यांनी 1 लाख 25 हजार मतांनी पराभव केला.

आशुतोष मसगौंडे

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2024 चार टप्प्यात पार पडली आहे. आता याचे निकाल येऊ लागले असून भाजपचे केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी पाच लाख मतांची विजय मिळवला आहे. त्यांना 512158 मते मिळाली आहेत.

दिग्गज नेत्यांमुळे काही जागा हॉट सीट्स झाल्या आहेत, ज्याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. त्यापैकी एक म्हणजे गुना-शिवपुरी लोकसभा मतदारसंघ, येथून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसने राव यदुवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली होती.

मतदारसंघात कुणाची ताकद?

ग्वाल्हेर राजघराण्याशी संबंधित असलेल्या सिंधिया कुटुंबासाठी गुणा-शिवपुरी लोकसभा जागा प्रतिष्ठेची आहे.

गुना लोकसभा मतदारसंघात संपूर्ण अशोकनगर जिल्हा आणि शिवपुरी व गुना जिल्ह्यांचा काही भाग समाविष्ट आहे.

या लोकसभेच्या अंतर्गत विधानसभेच्या 8 जागा देखील आहेत, त्यापैकी 2 काँग्रेसकडे, तर 6 जागा भाजपकडे आहेत. या विधानसभा जागांमध्ये शिवपुरी, गुना, अशोकनगर, बामोरी, चंदेरी, मुंगवली, पिचोर, कोलारस यांचा समावेश आहे.

अशोकनगर आणि बामोरीत काँग्रेसची सत्ता आहे. गुना लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले होते. येथे एकूण 72.43 टक्के मतदान झाले.

गेल्यावेळचा निकाल

मध्य प्रदेशातील ही अतिशय हाय प्रोफाइल गुना लोकसभा जागा सिंधिया राजघराण्याचा बालेकिल्ला मानली जाते. परंतु 2014 च्या निवडणुकीत 1 लाख 20 हजार 792 मतांनी विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा 2019 मध्ये भाजप उमेदवार डॉ. केपी यादव यांनी 1 लाख 25 हजार 549 मतांनी पराभव केला.

गुणा-शिवपुरी लोकसभा मतदारसंघात सलग 14 वेळा अजिंक्य राहिलेल्या सिंधिया राजघराण्यातील उमेदवाराचा हा पहिला पराभव होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकणारे केपी यादव पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि ते सिंधियाच्या खास लोकांमध्ये होते.

स्थानिक मुद्दे

गुना लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मते यावेळीही देशात मोदी सरकार येणार आहे. मोदी चांगले काम करत आहेत. अन्नदान योजना, गृहनिर्माण योजना, सन्मान निधी, आयुष्मान कार्डमुळे गरीबांवर 5 लाखांपर्यंत उपचार मोफत केले जात आहेत. गरिबांना लाभ मिळत आहे. त्यामुळे इथे सिंधियांना जिंकण्याची जास्त संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT