Kalicharan Maharaj arrest Facebook/@kalicharanmaharaj
देश

कालीचरणला 13 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

रायपुर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

सकाळ वृत्तसेवा

महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू धर्मगुरू कालीचरणला शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत सुनावली. रायपूर जिल्ह्याच्या जिल्हा अभियोजन अधिकारी हिना यास्मिन खान यांनी शुक्रवारी सांगितले की, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चेतना ठाकूर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी कालीचरणला (Kalicharan Maharaj) १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीत असलेल्या कालीचरणला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत त्यांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने कालीचरण महाराज यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे अधिकारी हिना खान यांनी सांगितले. हिंदू धर्मगुरू कालीचरणने 26 डिसेंबर रोजी रायपूर येथील धर्म संसदेच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींविरोधात अपमानास्पद शब्द वापरले होते आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेला नतमस्तक केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT