kamal haasan. 
देश

अर्धी जनता भुकेली असताना नवी संसद कशासाठी? कमल हसन यांचा PM मोदींना सवाल

सकाळवृत्तसेवा

तमिळनाडू : अभिनयातून सक्रिय राजकारणात उतरलेले सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी आज रविवारी केंद्र सरकारला नव्या संसद भवनाच्या निर्मितीवरुन सवाल विचारला आहे. त्यांनी म्हटलंय की, देशात आर्थिक आणीबाणीची इतकी वाईट परिस्थिती असताना तसेच लाखो लोक भुकेनं व्याकूळ असताना कोट्यवधी रुपये खर्चून नवी संसद बांधण्याची गरजच काय, असा कठोर सवाल त्यांनी केला आहे.

2021 मध्ये तमिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मक्कल निधी मय्यम या आपल्या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, या देशातील अर्धी जनता कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे भुकेली राहत आहे. असं असताना एक हजार कोटींच्या नव्या संसदेची गरजच काय आहे? जेंव्हा चीनमध्ये ग्रेट वॉल ऑफ चायना बांधताना हजारो लोक मेले तेंव्हा सत्ताधारी म्हणाले की, हे लोकांच्या सरंक्षणासाठी आहे. तर माननीय पंतप्रधान आता मला उत्तर द्या की,  कुणाच्या संरक्षणासाठी तुम्ही हजार कोटी रुपयांची संसद उभारत आहात? 

गेल्या 10 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन केले. नव्या संसद भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या आयोजनाला सर्वोच्च न्यायालयाने हरकत घेतली नसली तरी या कार्यक्रमाच्या आयोजनावर  नाराजी व्यक्त केली होती. संसदेच्या पुन:बांधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. 20 हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत 2022 पर्यंत ही इमारत बांधून पुर्ण होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT