kamalnath 
देश

आक्षेपार्ह वक्तव्यावर कमलनाथ यांचे अजब स्पष्टीकरण; म्हणाले...

सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माजी कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांचा आयटम असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या प्रकरणावरुन कमलनाथ यांच्यावर निशाणा साधलाय. प्रकरण तापत असल्याचं पाहून कमलनाथ यांनी यावर अजब स्पष्टीकरण दिलंय. 

मी जे म्हटलं, त्यात कोणालाही दुखावण्याचाही हेतू नव्हता. मला त्यांचं नाव लक्षात येत नव्हतं. मी हातातल्या कागदावरील यादी वाचत होतो. त्यावर आयटम नंबर.1, आयटम नंबर.2 असं लिहिण्यात आलं होतं. मग हा अपमान झाला का? शिवराज केवळ एक संधी शोधत आहेत, कमलनाथ कधीही कोणाचा अपमान करु शकत नाही, असं कमलनाथ म्हणाले आहेत. 

कमलनाथ हे डबरा येथील प्रचारसभेत बोलत होते. 'त्या कोण आहेत, मी त्यांचं नाव का घेऊ...तुम्ही मला सावध करायला हवं होतं...काय आयटम आहे, असं ते म्हणाले होते. कमलनाथ यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आणि या विरोधात दोन तास मौनव्रत धारण करणार असल्याचे सांगितले. 

ईडीकडून फारुख अब्दुल्ला यांची चौकशी; राजकीय हेतूने प्रभावित?

कमलनाथ यांचे वक्तव्य म्हणजे राज्यातील महिलांचा आणि दलित मुलींचा अपमान असल्याचे भाजपने म्हटलंय. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. एक महिला आणि दलित मुलीसाठी अपशब्द वापरणाऱ्या कमलनाथ यांचा धिक्कार आहे. कमलनाथ यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, हा तो देश आहे जिथे द्रौपदीच्या अपमानामुळे महाभारत झाले होते. राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दांत चौहान यांनी कमलनाथ यांचा समाचार घेतला.

दरम्यान, इमरती देवी या डबरा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उभ्या आहेत. गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. इमरती देवी या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आहेत. त्यांनी काँग्रेसचा त्याग करत भाजपत प्रवेश केला आहे. त्या आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT