Kamal Nath is likely set to step down as the Congress state president in Madhya Pradesh following defeat in the assembly elections 
देश

मध्य प्रदेशातील पराभव जिव्हारी! कमलनाथ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कमलनाथ आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कमलनाथ आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. ३ डिसेंबर रोजी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यातील तेलंगणासोडून इतर ठिकाणी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे.

न्यूज एजेन्सी एएनआयनुसार, कमलनाथ यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. यावेळी कमलनाथ यांना नवा प्रदेशाध्यक्ष शोधण्याच्या सूचना देण्यात आल्याचं समजतंय. (Kamal Nath is likely set to step down as the Congress state president in Madhya Pradesh following defeat in the assembly elections)

कमलनाथ यांनी इंडिया आघाडीतील काही नेत्यांवर टीका केली होती. त्यामुळेही काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. कमलनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांच्यावर जागा वाटपावरुन टीका केली होती.

मध्य प्रदेशमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यातील १६३ जागांवर विजय मिळवून भाजपने मोठे यश मिळवलं आहे. दुसरीकडे काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहेत. मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला मतदान पार पडले होते.

कमलनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणाले की, आणीबाणीनंतर १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना देखील याचा फटका बसला होता. पण, तीन वर्षानंतर १९८० मध्ये काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली होती. संसदेत आपण ३०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

Leopard Attack : आईवडिलांसमोर चिमुकल्या हियांशला बिबट्याने उचलले; गोंदिया जिल्ह्यातील खडकीवर शोककळा

Video: आईचं काळीज बघा.. शहीद मुलाला थंडी लागू नये म्हणून पुतळ्याला पांघरते ब्लँकेट; वृद्ध आईचा व्हिडीओ व्हायरल

Megablock: मुंबईकरांचे होणार मेगाहाल! रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे लोकलसेवा विस्कळीत, 'या' स्थानकांवरील थांबे बंद राहणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT