Kanchanjunga Express Accident Esakal
देश

Kanchanjunga Express Accident: बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि चुकीची वेळ... कांचनजंगा रेल्वे अपघातावेळी नेमकं काय घडलं?

Kanchanjunga Express Accident: सोमवारी बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. पायलटच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे कांचनजंगा रेल्वे अपघातात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. मालगाडीच्या लोको पायलटच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. द इंडियन एक्स्प्रेसने मिळवलेल्या कागदपत्रांवरून हे देखील उघड झाले आहे की, मार्गावरील स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली बंद होती आणि रंगपाणी स्टेशन व्यवस्थापकाने गाड्या ओलांडण्यासाठी 'पेपर लाइन क्लिअरन्स' दिला होता.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमन जया वर्मा सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले की, प्राथमिक दृष्टया ही मानवी चूक असल्याचे दिसते, परंतु तपासणीनंतर आम्हाला अधिक माहिती मिळेल. दुर्दैवाने, या अपघातात मालगाडीच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा आपल्याकडे कोणताही मार्ग नाही. मिळालेल्या माहितीनुसार असे दिसते की, सिग्नलकडे दुर्लक्ष केले गेले होते.

अपघातस्थळी उपस्थित असलेल्या एका रेल्वे सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मालगाडीच्या आधी किमान चार गाड्या सिग्नल ओलांडून गेल्या होत्या. एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले, 'स्वयंचलित सिग्नलिंग सिस्टमचा प्रोटोकॉल असा आहे की, लाल दिवा असल्यास, लोको पायलटला ट्रेन एका मिनिटासाठी थांबवावी लागते आणि नंतर हॉर्न वाजवत हळू चालवावे लागते. या प्रकरणात, असे दिसून येते की पायलटने सिग्नलवर वेग कमी केला नाही.

लोको पायलट उत्तर प्रदेशातील त्याच्या मुख्यालयात विश्रांती घेत असल्याचा दावाही सूत्राने केला. त्यांनी सकाळी 6.30 वाजता साइन इन केले आणि हा अपघात सकाळी 8.55 वाजता झाला. या घटनेची सर्वसमावेशक चौकशी करणे बाकी आहे आणि हे रेल्वे अधिकाऱ्यांचे प्रथमदर्शनी निष्कर्ष आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कवच ​​(भारतीय बनावटीची स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली जी एकाच मार्गावर दोन गाड्या धावत असताना अपघात टाळण्यास मदत करते) या विशिष्ट मार्गावर उपलब्ध नाही.

दरम्यान, लोको पायलटच्या संघटनेने रेल्वे अधिकाऱ्यांच्या या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. जेव्हा लोको पायलटचा मृत्यू झाला आणि CRS चौकशी प्रलंबित आहे, तेव्हा त्याला जबाबदार घोषित करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे, असे भारतीय रेल्वे लोको रनिंग मेन ऑर्गनायझेशनचे कार्यकारी अध्यक्ष संजय पांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT