देश

Kanhaiya in Congress: कम्युनिस्ट पक्ष म्हणतो, "तो आमच्या पक्षाशी..."

विनायक होगाडे

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमार तसेच गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिग्नेश मेवाणी यांचा प्रवेश अधिकृत रित्या झाला नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती. यावर याता कम्युनिस्ट पक्षाने आपलं मत मांडलं आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी डी राजा यांनी म्हटंलय की, कन्हैया कुमार स्वत:च माझ्या पक्षातून बाहेर पडला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष एका जातविरहित-वर्गविरहित समाजासाठी लढतो आहे. त्याला काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि आकांक्षा असाव्यात. त्याचा कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारधारेवर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे,

कन्हैया कुमार सामील होण्यापूर्वीही पक्ष अस्तित्वात होता आणि त्याच्या बाहेर पडण्यानंतरही पक्ष यशस्वी होईल. त्याच्याबरोबर पक्ष काही संपणार नाहीये. आमचा पक्ष हा निःस्वार्थ संघर्ष आणि बलिदानासाठी आहे. कन्हैया कुमार आमच्या पक्षाशी प्रामाणिक आणि सत्यवादी नव्हता, असंही त्यांनी म्हटलंय.

कन्हैया कुमारने आपल्या पक्ष प्रवेशावेळी म्हटलंय की, आमचं हे म्हणणं आहे की आज देशाला भगतसिंगांच्या वीरतेची गरज आहे. गांधींच्या एकतेची गरज आहे. आंबेडकरांच्या समानतेची गरज आहे आणि हाच विचार जपण्याची गरज आहे, म्हणून मी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. मला असं जाणवतंय की, या देशात काही लोक, विचारधारा या देशातील चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या विचारधारेला तुम्ही आपोआपच ओळखून जाल. आम्ही आमचे विरोधक ओळखून आहेत. त्यामुळे आम्ही असा निर्णय केला की या देशातील सर्वांत मोठी लोकशाही पक्षामध्ये प्रवेश करायचा. हेच या देशातील अनेक तरुणांना वाटतंय.

यावेळी बोलताना जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलंय की, मी अधिकृतरित्या काँग्रेस पक्षामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. सध्या मी अपक्ष आमदार आहे. जर मी पक्षप्रवेश केला तर मी आमदार पदावर राहू शकत नाही. मात्र, मी काँग्रेसच्या विचारधारेसोबतच असेन. येत्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हासह निवडणूक लढवेन.

लोकशाही आणि 'आयडीया ऑफ इंडिया' या दोन्हीला वाचवण्यासाठी मी काँग्रेस पक्षासोबत आहेत. या पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढली आणि ब्रिटीशांना देशाबाहेर काढलंय, म्हणूनच मी पक्षासोबत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT