Kanhaiya Kumar
Kanhaiya Kumar 
देश

हिंदुत्व म्हणजे 'फेअर अँड लव्हली क्रीम' नाही की...; कन्हैय्या कुमार यांंचं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

नांदेड - हिंदुत्व म्हणजे काही 'फेअर अँड लव्हली' क्रीम नाही, हिवाळा आला की ओठांसाठी वेगळी आणि पायांसाठी दुसरी असं विधान काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले. 'हिंदुत्व एक विचारसरणी आहे. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान कन्हैया कुमार यांनी हे वक्तव्य केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेत कन्हैया कुमार सामील झाले आहे. (Kanhaiya says Hindutva is not 'Fair and Lovely cream)

कन्हैया कुमार म्हणाले, "व्हॉटसअॅपच्या माध्यमातून आज जे हिंदुत्व पेरलं जात आहे आणि ज्या पद्धतीने ते सॉफ्ट आणि आक्रमक म्हणून सादर केले जात आहे. धर्माच्या नावाखाली विष पसरवलं जात आहे. धर्माच्या नावाखाली परस्परांशी लढणारी कोणतीही विचारधारा धार्मिक म्हणता येणार नाही.

काँग्रेस नेते म्हणाले की, देशात गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. आपले सार्वजनिक क्षेत्रील कंपन्या विकल्या जात आहे. "अदानीकडे एलआयसीचे किती शेअर्स आहेत ते बघा. अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणार आहेत. आपले पैसे घेऊन लोक श्रीमंत होत आहे. मात्र तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे इथे सॉफ्ट आणि आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दाच नाही. आपल्या सत्य पाहावं लागेल, असंही कन्हैया यांनी म्हटलं.

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही यात्रा शनिवारी ६६व्या दिवशी हिंगोलीच्या पुढे पोहोचली. आतापर्यंत सहा राज्यांतील २८ जिल्ह्यांमधून ही यात्रा पार पडली आहे. यात्रेत सुमारे १५० दिवसांच्या प्रवासात ३,५७० किमी अंतर पार केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT