Kiccha Sudeep esakal
देश

Kiccha Sudeep : दक्षिणेचा 'हा' मेगास्टार भाजपमध्ये प्रवेश करणार? आज मोठ्या घोषणेची शक्यता

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रचारासाठी तो मैदानात उतरू शकतो, असं बोललं जात आहे.

Balkrishna Madhale

निवडणुकीत सुदीप भाजपचा प्रचार करू शकतो आणि नंतर एमएलसी पदासाठी दावा करण्याची शक्यता आहे. सुदीपची मध्य कर्नाटकात आणि विशेषत: अनुसूचित जमातींमध्ये बरीच लोकप्रियता आहे.

कन्नड सुपरस्टार 'किच्चा' सुदीप (Kiccha Sudeep) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) उतरण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रचारासाठी तो मैदानात उतरू शकतो, असं बोललं जात आहे. मात्र, त्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, गुरुवारी तो याबाबत घोषणा करु शकतो.

निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात बड्या कलाकारांचा प्रवेश ही काही नवीन गोष्ट नाहीये. 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या सिनेस्टार्सची फौज रिंगणात होती.

आज सुदीप आपल्या राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा करू शकतो. तो भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सुदीपच्या निवासस्थानी एक बैठक होणार आहे. यामध्ये तो निवडणूक लढवायची की फक्त प्रचार करायचा याविषयी पुढील नियोजनावर कुटुंबातील सदस्यांचं मत घेणार असल्याचं कळतंय.

निवडणुकीत सुदीप भाजपचा प्रचार करू शकतो आणि नंतर एमएलसी पदासाठी दावा करण्याची शक्यता आहे. सुदीपची मध्य कर्नाटकात आणि विशेषत: अनुसूचित जमातींमध्ये बरीच लोकप्रियता आहे. भाजपनं दक्षिण भारतीय राज्यातील उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं की, 8 एप्रिल रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये उमेदवारांची नावं निश्चित केली जातील. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT