Rescue teams and police inspect the site after a powerful blast near a mosque in Kanpur’s Mishri Bazaar that left six people injured.

 

esakal

देश

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Major explosion near mosque in Kanpur : स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की परिसरातील दुकान तसेच घरांच्या भिंतींनाही तडे गेले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Massive explosion in Kanpur’s Mishri Bazaar : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मूलगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिश्री बाजारात आज (बुधवार) संध्याकाळनंतर झालेल्या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार हा स्फोट एका मशिदीजवळ झाला आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोट घडल्यानंतर बाजारात एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली, यामुळे  चेंगराचेंगरी देखील झाली, लोक सुरक्षित ठिकाणी लपण्यासाठी धावत होते.

स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, त्याच्या हादऱ्याने जवळपासच्या अनेक दुकानांच्या आणि घरांच्या भिंतींनाही तडे गेले. तर हाती आलेल्या माहितीनुसार या घटनेत एका महिलेसह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीने उर्सुला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही स्कूटरमध्ये ठेवलेल्या वस्तूमुळे स्फोट झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. संशयास्पद वस्तू, वाहनाच्या बॅटरीचा स्फोट किंवा काही घातपाताचा कट यासह सर्व शक्यता पोलिस तपासत आहेत. तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक टीम उपस्थित असून तपास करत आहे.

स्फोटाची माहिती मिळताच कानपूरच्या अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय, या परिसरात बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकासह मोठ्याप्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला असून, कसून तपास सुरू आहे.

दोन स्कूटरमध्ये झाला स्फोट -

सहपोलिस आयुक्त  आशुतोष कुमार यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की,  "मूलगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिश्री बाजार परिसरात उभ्या केलेल्या दोन स्कूटरमध्ये आज स्फोट झाला. ही घटना संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. या घटनेत एकूण सहा जण जखमी झाले आहेत. सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT