देश

बाबा का ढाबा : रातोरात मिळालेली प्रसिद्धी संपली, रेस्टॉरंट बंद

शरयू काकडे

दिल्ली : काही दिवसांपूर्वी 'बाबा का ढाबा' सोशल मिडियावर खूप ट्रेंड झाला. बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचीच सगळीकडे चर्चा होती. 'बाबा का ढाबा' इतका व्हायरल झाला की तेथे जेवण्यासाठी लोकांची लाईन लागली होती. कांता प्रसाद यांना लोकांकडून मिळालेल्या मदतीच्या पैशातून त्यांनी नवीन रेस्टॉरंट देखील सुरु केले. पण आता कांता प्रसाद यांना हे रेस्टॉरंट बंद करावे लागत आहे. त्यांनी पुन्हा त्यांच्या जुन्या ढाब्यावरच काम करण्यास सुरवात केली आहे.

तुम्हाला माहित असेल की गेल्या वर्षी 'बाबा का ढाबा'' कांता प्रसाद यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. कोरोनामुळे आर्थिक समस्यांचा सामना करण्याऱ्या वयस्कर जोडप्याचा व्हिडिओ एका युट्युबरने पोस्ट केला होता. हा व्हिडिओ खूप शेअर केला गेला आणि अचानक या ढाब्यावर येणाऱ्या लोकांची संख्या वाढली.

कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवी यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कित्येक लोकांनी मदतीचा हात पुढे केला. कित्येक मोठ्या सेलिब्रिटींनी चांगली मोठी रक्कम मदत निधी म्हणून दिली होती. याच मदतीनिधीतून कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट सुरु केले. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन हे हळू हळू ग्राहकांची संख्या कमी झाली, त्यामुळे नवीन रेस्टॉरंट जास्त दिवस चालू शकले नाही. त्यामुळे नव्या रेस्टॉरंटमध्ये त्यांचे खूप नुकसान झाले. अखेर कांता प्रसाद यांना दिल्लीतील दक्षिण मालवीय भागातील नवीन रेस्टॉरंट बंद करावे लागले आणि त्यांनी पुन्हा जुना ढाबा चालवणे सुरू केले.

''1 लाखाची गुणंतवणूक केल्यानंतर फक्त 35000 रुपये कमावले. त्यामुळे खूप नूकसान होत असून रेस्टॉरंट बंद करावे लागत आहे'' अशी माहिती कांता प्रसाद यांनी एएनआयसोबत बोलताना दिली. ते म्हणाले, की, आता मी माझ्या जुना ढाबा चालवत असून त्यातच आनंदी आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ढाबा चालवेन. जेव्हा व्यवसायात तोटा होईल तेव्हा मी बंद करेन. मी मागच्या वर्षी मदतनिधीमध्ये मिळालेल्या पैशांपैकी 20 लाख स्वत:साठी आणि पत्नीसाठी बाजूला ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT