Kargil Vijay Diwas rajnath singh announces setting up of joint theatre commands Sakal
देश

Kargil Vijay Diwas : लवकरच थिएटर कमांड : राजनाथ सिंह

तिन्ही संरक्षण दलांच्या कार्यवाहीत अधिक समन्वय निर्माण व्हावा यासाठी संयुक्त थिएटर कमांड स्थापन करणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले

सकाळ वृत्तसेवा

जम्मू : तिन्ही संरक्षण दलांच्या कार्यवाहीत अधिक समन्वय निर्माण व्हावा यासाठी संयुक्त थिएटर कमांड स्थापन करणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले. तसेच, संरक्षण साहित्याचा सर्वांत मोठा आयातदार देश अशी ओळख बदलून या साहित्याचा निर्यातदार देश बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरु असल्याचेही राजनाथसिंह यांनी सांगितले. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी जम्मू काश्‍मीर पीपल्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते. कारगिल युद्धावेळी भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त मोहिम राबविली होती.

त्याचा संदर्भ देत राजनाथसिंह यांनी, अशा प्रकारच्या मोहिमा राबविण्यासाठी देशात संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे सांगितले. संरक्षण साहित्याच्या निर्यातीत भारत आघाडी घेत असल्याचेही ते म्हणाले. ‘ भारत हा एकेकाळी सर्वांत मोठा संरक्षण साहित्याचा आयातदार होता. आता संरक्षण साहित्यांची निर्यात करणाऱ्या २५ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतातून सध्या १३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याची निर्यात होत असून पुढील तीन वर्षांत तीन चाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे प्रयत्न असतील,’ असे राजनाथसिंह यांनी सांगितले. तिन्ही सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा मिळून तयार केलेल्या विभागाला थिएटर कमांड म्हणतात.

पाकव्याप्त काश्‍मीरबाबत भारताच्या संसदेत प्रस्ताव मंजूर झाला होता. पाकव्याप्त काश्‍मीर हा भारताचा भाग होता, आहे आणि भविष्यातही राहिल. शिवस्वरुप बाबा अमरनाथ आमच्याकडे आणि शक्तीरुपातील देवी शारदा नियंत्रणे रेषेपलिकडे, असे कसे शक्य आहे?

- राजनाथसिंह, संरक्षण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : 'इलेक्शन ऐवजी थेट सिलेक्शन करा'! निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे वैतागले

Local Body Election: निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही, ८ टर्म निवडून येणारे बाळासाहेब थोरात कसे पडले? ठाकरे बंधूंच्या मागण्या काय?

Latest Marathi News Live Update : 2024 नंतर जी यादी जाहीर केली त्यात फक्त नाव आहेत- राज ठाकरे

MAI Image 1 : Gemini अन् ChatGPT ला टक्कर! मायक्रोसॉफ्टने आणलं भन्नाट फीचर, आता बनवा एकापेक्षा एक भारी फोटो..असं वापरा MAI Image 1

Zilla Parishad Scam : देवाच्या कामात पैसे खाल्ला पण वर्षभरही पचले नाहीत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

SCROLL FOR NEXT