Karnataka Abortion Racket esakal
देश

Karnataka Abortion Racket : धक्कादायक! तीन महिन्यांत 242 भ्रूणहत्या; दोन डॉक्टरांसह नऊ जणांना अटक

दोन वर्षांत त्यांनी ९०० हून अधिक स्त्री-भ्रूण हत्या केल्याचा संपवल्याचा संशय आहे.

सकाळ डिजिटल टीम

आरोपी हे प्रामुख्याने म्हैसूर आणि मंड्या जिल्ह्यातील आहेत. आयुर्वेद डॉक्टरची पत्नीही आरोपी आहे.

बंगळूर : दोन डॉक्टरांसह (Doctor) नऊ जणांना अटक करून राज्यात स्त्री- भ्रूण हत्येचे सर्वात मोठे प्रकरण उघडकीस आणले आहे, अशी माहिती बंगळूर शहराचे पोलिस (Bangalore Police) आयुक्त बी. दयानंद यांनी मंगळवारी दिली. या टोळीने अवघ्या तीन महिन्यांत २४२ भ्रूणहत्या (Abortion Racket) केल्याचे त्यांनी सांगितले.

बी. दयानंद म्हणाले, ‘‘महिलांच्या बेकायदेशीर गर्भलिंग चाचण्या घेतल्या. स्त्री-भ्रूण हत्या केली. याप्रकरणी बालरोगतज्ज्ञ, ज्याची आई देखील एक डॉक्टर आहे आणि एक आयुर्वेद डॉक्टर हे या टोळीमागील मास्टरमाइंड आहेत. म्हैसूरच्या जिल्हा मुख्यालयातील उदयगिरी येथे त्यांचे रुग्णालय आहे.

१५ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणी दरम्यान, बायप्पनहळ्ळी पोलिसांनी संशयास्पदपणे फिरत असलेले वाहन थांबवले. पोलिसांनी रहिवाशांची चौकशी केली असता ते भ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे समोर आले. ही टोळी गर्भवती महिलांच्या गर्भलिंग चाचण्या करत तसेच स्त्री गर्भ असल्याचे निदर्शनास आल्यास ते नष्ट करायचे. आम्ही आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

त्यापैकी दोन डॉक्टर, तीन लॅब टेक्निशियन किंवा हॉस्पिटलमधील कंपाउंडर, हॉस्पिटल मॅनेजर आणि रिसेप्शनिस्ट व्यतिरिक्त तीन दलाल आहेत. फरार असलेल्या दोन दलालांचा शोध सुरू आहे.’’ आरोपी हे प्रामुख्याने म्हैसूर आणि मंड्या जिल्ह्यातील आहेत. आयुर्वेद डॉक्टरची पत्नीही आरोपी आहे.

त्यांनी मंड्या जिल्ह्यातील दुर्गम खेड्यात गूळ उत्पादन युनिटमध्ये त्यांचे क्लिनिक चालवतात. गर्भपातासाठी तेथे आवश्यक असलेली सर्व उपकरणे होती. दोन वर्षांत त्यांनी ९०० हून अधिक स्त्री-भ्रूण हत्या केल्याचा संपवल्याचा संशय आहे. त्यांनी गर्भलिंग चाचणीसाठी २० हजार ते २५ हजार रुपये आणि गर्भपातासाठी अतिरिक्त ५० हजार रुपये घेत, असे दयानंद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT