Karnataka Election 2023
Karnataka Election 2023 esakal
देश

Karnataka Election 2023 : मतं द्या अन् महिन्याला दोन हजार मिळवा; काँग्रेसचा अजबच दावा

संतोष कानडे

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये एका अनोख्या योजनेचा समावेश केलाय. सध्या देशभर त्याचीच चर्चा झडत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येतंय. हिमाचल प्रदेशप्रमाणेच कर्नाटकातही काँग्रेसकडून आश्वासनांची खैरात वाटणं सुरुय. सरकार आल्यानंतर आम्ही महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना आणू असं काँग्रेसने जाहीर केलं आहे.

महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने ही योजना आणलेली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दोन हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

हेही वाचाः आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

शिवकुमार यांनी सांगितलं की, जर काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला कोणत्याही अटींशिवाय २००० रुपये देण्यात येतील. यापूर्वी पक्षाने २०० युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं.

हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेस जोमाने कामाला लागल्याचं दिसत आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेृत्वाखाली कर्नाटकमध्ये भाजप सत्तेत आहे. भाजपला पायउतार करण्यासाठी काँग्रेसकडूनही नानाविध क्लृप्त्या लढवल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT