Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka Election : भाजपला पराभवाची भीती? Exit Poll जाहीर होताच कर्नाटकात मोदींच्या तब्बल 20 सभा!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आलाय.

Balkrishna Madhale

हैदराबाद-कर्नाटक हा प्रदेश काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रदेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इथं फारसं यश मिळालं नाही. पक्षाला इथं केवळ 15 जागा जिंकता आल्या.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आलाय, त्यामुळं स्टार प्रचारक म्हणून पक्षाच्या राज्य युनिटनं पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) किमान 20 रॅलींचं नियोजन केलंय.

कर्नाटकात 10 मे रोजी राज्यातील सर्व 224 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 मे दरम्यान राज्यात तळ ठोकू शकतात. या दरम्यान ते काँग्रेस (Congress) आणि जेडीएसच्या (JDS) बालेकिल्ल्यात प्रचार करू शकतात.

काँग्रेस आणि जेडीएस राज्यातील सत्ताधारी भाजपविरोधात (BJP) संपूर्ण रणनीती बनवत आहेत, त्यामुळं त्यांना सत्ताविरोधी लाटेशी लढावं लागणार आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांची जादू निवडणूक जिंकण्यास मदत करू शकते, असं पक्षाच्या रणनीतीकारांचं मत आहे.

राजकारणाच्या दृष्टीनं कर्नाटकची सहा झोनमध्ये विभागणी करण्यात आलीये, त्या प्रत्येकामध्ये किमान तीन सभा घेण्याची पंतप्रधान मोदींची योजना आहे. हैदराबाद-कर्नाटकच्या काही भागात, जिथं जवळपास 40 विधानसभेच्या जागा आहेत, तिथं पंतप्रधानांच्या आणखी रॅली होऊ शकतात.

Karnataka Assembly Election 2023

हैदराबाद-कर्नाटक हा प्रदेश काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रदेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इथं फारसं यश मिळालं नाही. पक्षाला इथं केवळ 15 जागा जिंकता आल्या. पंतप्रधान मोदी यांनीही कर्नाटकला आपल्या अजेंड्यात सर्वोच्च स्थान दिलंय. मोदींनी निवडणूक तारखांच्या आधी हुबळी, मंड्यासह विविध ठिकाणी सात सभा घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

पगारवाढीसाठी हजारो कर्मचारी आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन; गाड्या पेटवल्या, पोलिसांवर दगडफेक

Malvan Ice Mystery : कोकणात निसर्गाचा अजब चमत्कार! निळ्याशार आकाशातून थेट घरावर पडला 5 किलोचा बर्फाचा गोळा; मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत?

Gold Rate Today: युद्धाच्या भीतीने सोनं स्वस्त! आजचा भाव किती? सोन्यात आणखी घसरण होणार?

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

SCROLL FOR NEXT