Karnataka Election Result Live Updates  
देश

Karnataka Election 2023: "द्वेषाचा बाजार बंद झाला, प्रेमाचं दुकान उघडलं"; विजयानंतर राहुल गांधींनी व्यक्त केल्या भावना

कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. कर्नाटकात द्वेषाच्या नव्हे तर प्रेमाच्या जोरावर जिंकली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. (Karnataka Assembly Election 2023 Rahul Gandhi speaks on Congress wins)

"द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचं दुकानं उघडलं आहे. हा सर्वांचा विजय आहे, सर्वात आधी हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकच्या निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेला पाच वायदे केले होते. माझ्या भाषणात मी, खर्गेजी आणि आमच्या या नेत्यांना याची ग्वाही दिली होती. आम्ही हे वायदे पहिल्याच दिवशी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करणार आहोत. मी पुन्हा एकदा कर्नाटकच्या जनेतला मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या दमदार विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, कर्नाटकात २२४ जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. काँग्रेस १३७ जागांवर विजयी झाला असून भाजप ६२, जेडीएस २१, इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत, हे आकडे जवळपास निश्चित मानले जात आहेत. बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसला असा दणदणीत विजय मिळाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

SCROLL FOR NEXT