Karnataka Election Sakal
देश

Karnataka Election : भाजपचा धुव्वा, काँग्रेसचा विजय! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक विधासभेच्या निवडणुका संपल्या असून आज मतमोजणी पार पडत आहे. तर आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्ष भाजपपेक्षा दुप्पट जागांनी पुढे असून भाजपचा धुव्वा उडाला आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस आपली एकहाती सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जातंय. पण भाजपच्या पराभवावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

मीम्समधून नेटकऱ्यांनी वेगवेगळे फोटो पोस्ट केले असून भाजप कार्यकर्त्यांना ट्रोल केलं आहे. त्याचबरोबर भाजपला कर्नाटकी जनतेने चांगलीच अद्दल घडवली असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आयपीएलच्या सामन्यात गौतम गंभीर आणि विराट कोहलीमध्ये वाद झाला होता. त्यावेळचा गंभीरने तोंडावर बोट ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोची आणि राहुल गांधी यांच्या तोंडावर बोट ठेवल्याच्या फोटोची तुलना केली जात असून येथेच भाजपचा पराभव झाल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

नेटकऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे मद्यपान केलेल्या अवस्थेतील फोटो शेअर केले आहेत. काही लोकं भाजपचा रूमाल गळ्यात गुंडाळून रस्त्यावर पडलेले या मीममध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT