BJP esakal
देश

Karnataka Election : भाजपकडून 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; यादीतून माजी मुख्यमंत्र्यांचं नाव गायब

भारतीय जनता पक्षानं (BJP) काल (बुधवार) उशिरा कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

Balkrishna Madhale

भाजपनं त्यांना तिकीट न दिल्यास हुबळी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची धमकीही त्यांनी दिली होती.

Karnataka Assembly Election 2023 : भारतीय जनता पक्षानं (BJP) काल (बुधवार) उशिरा कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मंगळवारी 189 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 24 तासांच्या आत भाजपनं दुसरी यादी जाहीर केलीये.

भाजपनं मंगळवारी 224 सदस्यीय विधानसभेतील 189 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आणि काल आणखी 23 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. म्हणजे, अजून 12 उमेदवारांची घोषणा व्हायची आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांचे नातेवाईक आणि जवळचे एनआर संतोष यांचंही नाव या यादीतून गायब आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या या दुसऱ्या यादीत हुबळी जागेचाही समावेश नाहीये. इथून माजी मुख्यमंत्री राहिलेले भाजपचे विद्यमान आमदार जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांना तिकीट न मिळाल्याचे संकेत दिले होते.

शेट्टर यांनी भाजपकडं तिकीटाची मागणी केली. यासोबतच भाजपनं त्यांना तिकीट न दिल्यास हुबळी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची धमकीही त्यांनी दिली होती. हुबळीतून सहा वेळा विजयी झालेले शेट्टर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची धमकी लक्षात घेऊन पक्ष नावं निश्चित करत असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मंगळवारी सांगितलं होतं की, पक्ष दोन टप्प्यात उमेदवारांची यादी जाहीर करेल, परंतु या यादीत केवळ 23 नवीन नावं असल्यामुळं तिसरी आणि अंतिम यादी येणं बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरला! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT