Siddaramaiah esakal
देश

Siddaramaiah : कानाला झेंडूचं फूल लावून काँग्रेस नेते का पोहोचले सभागृहात? काय होता नवा प्लान!

सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि इतर विरोधी आमदार कानाला झेंडूची फुलं लावून सभागृहात दाखल झाले.

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सिद्धरामय्या यांनी बोम्मई सरकारवर वारंवार हल्लाबोल केला.

Karnataka Budget : कर्नाटकातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे इतर नेते कानाला झेंडूची फुलं लावून सभागृहात पोहोचले. वास्तविक, काँग्रेस नेते (Congress) भाजप सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हे करत आहेत.

कर्नाटकातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी वेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा निषेध नोंदवला आहे.

सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि इतर विरोधी आमदार कानाला झेंडूची फुलं लावून सभागृहात दाखल झाले. भाजप सरकारनं (BJP Government) जनतेची फसवणूक केलीये. मागील अर्थसंकल्प आणि जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण न करता भाजप सरकारनं राज्यातील जनतेला मूर्ख बनवलंय, अशी टीका काँग्रेसनं केलीये.

राज्याचे अर्थमंत्री असलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज या सरकारमधील आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. कर्नाटक काँग्रेसनं याला 'किवी मेले हुआ' म्हणजे, कानातलं फूल असं संबोधलंय. हे प्रतीकात्मकपणे सूचित करतं की, कोणीतरी त्यांना मूर्ख बनवलंय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सिद्धरामय्या यांनी बोम्मई सरकारवर वारंवार हल्लाबोल केला. सरकारनं निवडणूक जाहीरनाम्यात 600 आश्वासनं दिली होती, परंतु त्यापैकी 10 टक्केही पूर्ण करू शकले नाही. दुसरीकडं, 'मुख्यमंत्री म्हणतात की सरकार अर्थसंकल्पादरम्यान कृती अहवाल आणेल, यामध्ये भाजप सरकार 2018 च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची माहिती देईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT