Karnataka cheap diesel sale in Maharashtra esakal
देश

कर्नाटकातील स्वस्त डिझेलची महाराष्ट्रात विक्री; दररोज 30 हजार लिटरचा पुरवठा, सीमाभागातील अनेक पंपांना फटका

Sale of cheap diesel from Karnataka in Maharashtra; Many pumps in the border areas were affected. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात जवळपास साडेचार रुपयांनी डिझेल स्वस्त आहे. पेट्रोलही स्वस्त आहे.

उदयसिंग पाटील

कर्नाटकाच्या सीमेवर १०० च्या आसपास पंप आहेत. महाराष्ट्रापेक्षा कमी दर असल्याने अनेक वाहनधारक कर्नाटकात जाऊन डिझेल, पेट्रोल भरतात.

कोल्हापूर : कमी दर असलेले कर्नाटकातील डिझेल (Karnataka Diesel) महाराष्ट्रातील (Maharashtra) सीमाभागात विक्रीच्या गोरखधंद्याने जोर धरला आहे. अधिकृत टॅंकरशी मिळतीजुळती असलेली रंगसंगती करून बेकायदेशीर छोट्या टॅंकरमधून जिल्ह्याच्या विविध हद्दीत दररोज ३० हजार लिटरच्या आसपास डिझेल विकले जात आहे. यातून शासनाचा महसूल बुडत असून, महाराष्ट्रातील अनेक पंपांना फटका बसत आहे.

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात जवळपास साडेचार रुपयांनी डिझेल स्वस्त आहे. पेट्रोलही स्वस्त आहे, पण डिझेलची विक्री बल्कमध्ये होत असल्याने त्यातून फायदा कमावणारे काहीजण तयार झाले आहेत. त्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले, शिरोळ या पाच तालुक्यांना कर्नाटकची सीमा (Karnataka Border) लागते.

सहा हजार लिटर क्षमतेचे बाऊझर अनेक पंपधारक मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वापरतात. त्याच धर्तीवर बाऊझर बनवले असून, त्यांची रंगसंगती अधिकृत टॅंकरशी मिळतीजुळती केली आहे. त्यामुळे सहज कुणालाही टॅंकरचा फरक समजत नाही. अशा बाऊझरमध्ये कर्नाटकातील सीमाभागातील पंपांवरून डिझेल घ्यायचे. जिल्ह्याच्या हद्दीतील पाच तालुक्यांत येण्यासाठी अनेक आडमार्ग आहेत. त्या आडमार्गाने रात्रीत येऊन कोणत्या तरी आडमार्गावर ते संबंधितांकडे रिकामे करायचे, असा प्रकार सुरू आहे.

एका टॅंकरची क्षमता सहा हजार लिटरची आहे. यानुसार ३० हजार लिटरच्या आसपास डिझेल विविध ठिकाणी विकले जात आहे. त्यासाठी दररोज चार ते पाच बाऊझर (टॅंकर) काम करत असल्याचे समजते. त्यांचे ग्राहक शक्यतो ट्रक, बस तसेच जिथे डिझेल दररोज लागते, असे मोठे कारखाने आहेत. दररोज बल्कमध्ये डिझेल लागत असल्याने प्रत्येक लिटरमागे दोन-अडीच रुपयांची बचत झाली तरी त्यांचा फायदा आहे. तसेच विकणाऱ्यांनाही दोन रुपये मिळतात. यातून दोन्ही बाजूचा फायदा होत असल्याने कुणी काहीच बोलत नाही.

या प्रकाराबाबत असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे. त्यांच्याकडून आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासणी केल्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला, पण प्रकार सुरू आहे. यातून शासनाचा महसूल बुडत आहे, त्यांनीच उपाययोजना करायला हवी.

-अरविंद तराळ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन

सीमेवर १०० वर पंप

जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांची संख्या ३०० वर आहे. त्यातील कर्नाटकाच्या सीमेवर १०० च्या आसपास पंप आहेत. महाराष्ट्रापेक्षा कमी दर असल्याने अनेक वाहनधारक कर्नाटकात जाऊन डिझेल, पेट्रोल भरतात. मोठ्या प्रमाणावर डिझेल लागणाऱ्या ग्राहकांवर पंपचालक अवलंबून होते. आता त्यातील बहुतांशजणांकडे असा पुरवठा होत असल्याने पंपांना मोठा फटका बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT