Crime Esakal
देश

Online Betting: धक्कादायक! ऑनलाईन सट्टेबाजीत पतीने गमावले १.५ कोटी रूपये; कर्जदारांनी पत्नीवर केले अत्याचार, पत्नीने..

कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा या ठिकाणी धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये पती दीड कोटी रुपये हारल्यानंतर कर्ज देणाऱ्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपलं जीवन संपवलं.

सकाळ डिजिटल टीम

Husband Lost 1.5 Crore in Betting: कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा या ठिकाणी धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये पती दीड कोटी रुपये हारल्यानंतर कर्ज देणाऱ्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपलं जीवन संपवलं. तिने लिहिलेल्या पत्रात कर्ज देणाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत या पत्राच्या आधारे १३ लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या १३ लोकांपैकी तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

दर्शन बालू हा व्यक्ती होसदुर्गामधील सिंचन विभागात असिस्टंट इंजिनियर पदावर कार्यरत होता. लवकर श्रीमंत होण्याच्या नादात त्याने ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये पैसे लावणं सुरु केलं. या सट्टेबाजीत तो १.५ कोटी रुपये हारला. कर्ज देणाऱ्यांचे पैसे परत करु न शकल्याने ते घरी येऊन त्याच्या पत्नीला त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दर्शनाने जीवन संपवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने आपल्या पत्रात आऱोप केलाय की तिच्या पतीने ज्या लोकांकडून पैसे उधार घेतले होते, ते नेहमी घरी येऊन तिला त्रास देत अत्याचार करत होते. त्यांनी कुटुंबाला धमकीही दिली होती की, जर पैसे परत केले नाहीत तर ते पूर्ण कुटुंबाची बदनामी करतील. यामुळे रंजिता घाबरली आणि या त्रासाला कंटाळून तिने १९ मार्चला टोकाचं पाऊल उचललं. (Latest Marathi news)

रंजिताच्या वडिलांनी आतापर्यंत १३ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, ज्यांच्याकडून त्यांच्या जावयाने कर्ज घेतलं होतं. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, १३ संशयित आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ नुसार आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप तिघांना अटक करण्यात आली आहे. अन्य संशयित आरोपी अजूनही फरार आहेत.

पोलिसांनुसार, दर्शनने घेतलेल्या १.५ कोटी रुपयांच्या कर्जापैकी बहुतांश लोकांचे पैसे परत केले होते. त्यानंतर फक्त ५४ लाखांची परतफेड करणं बाकी होतं. सासऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत, त्यांनी आपला जावई निर्दोष असल्याचे सांगितले आहेत. तक्रारीनुसार, दर्शन सट्टेबाजी खेळण्यासाठी अजिबात इच्छूक नव्हता. कर्ज देणाऱ्या लोकांनी त्याला आर्थिक परताव्याचं आमिष दाखवत या जाळ्यात ओढलं.(Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT