Karnataka Election 2023
Karnataka Election 2023 Esakal
देश

Karnataka Election 2023: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची बैठक सुरू असतानाच सापाची एंन्ट्री अन्...

अंकिता खाणे (Ankita Khane)

CM Basavaraj Bommais News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. समोर आलेल्या माहितीनुसार आता काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे 114 उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत.

तर भाजपचे 73 उमेदवार पुढे पाहायला मिळत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. भाजपकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वात बैठक सुरू असताना त्याठिकाणी अचानक साप घुसला आणि एकच खळबळ उडाली.

भाजपचे उमेदवार शिवराज सज्जन यांच्या घरामध्ये बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू होती. या बैठकीला भाजपचे इतरही नेते उपस्थित होते. याचवेळी शिवराज सज्जन यांच्या घरात साप घुसला. याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी या सापाला बाहेर काढलं.

काँग्रेस बहुमताच्या जवळपास आहे. 114 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपा 73, जेडीएस 30 तर इतर 5 जागांवर आघाडीवर आहे.

कल सातत्याने बसदळत आहेत. अशातच फोडाफोडीचे राजकारण होईल यामुळे आपल्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. विजयी उमेदवारांना हैद्राबादला सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

कर्नाटकात भाजपसह काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेस कंबर कसत आहे. सध्या मतमोजीणी सुरु असून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे.

घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे. नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?

असा सवाल पक्षासह देशभरात उपस्थित होत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी संकटमोचक ठरलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत.

निवडून आलेल्या नेत्यांना आमदारांना एकत्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. तशाच हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत. किंगमेकर असणाऱ्या जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेत्यानी चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत.

तर काँग्रेसचेही काही नेते जेडीएसच्या संपर्कात आहेत. बहुमताचा आकडा सातत्याने बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: लाल किल्ल्यावरून सांगतो त्यांची प्रतिष्ठा वाढलीच पाहिजे.. अदानी अंबानीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे छातीठोक उत्तर

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 'शिवप्रतिष्ठान'कडून कॅफेची तोडफोड

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल

SCROLL FOR NEXT