Government School CM Siddaramaiah  esakal
देश

Government Schools : आता राज्यातील सर्व सरकारी शाळांना मिळणार मोफत वीज, पिण्याचं पाणी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सकाळ डिजिटल टीम

कन्नडमध्ये शिक्षण घेतल्यास नोकरी मिळणार नाही, ज्ञान मिळवता येणार नाही, अशा गैरसमजाने इंग्लिश कॉन्व्हेंटचा मोह वाढला आहे.

बंगळूर : राज्यातील सर्व सरकारी शाळांना (Government School) मोफत वीज आणि पिण्याचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी बुधवारी (ता. १) येथे केली. इंग्रजी, हिंदीबरोबरच कन्नड माध्यमातून स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) लिहिण्याची परवनगी देण्याचा केंद्र सरकारकडे (Central Government) त्यांनी आग्रहही धरला.

येथील कंठीरव स्टेडियमवर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे आयोजित ६८ व्या राज्योत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ध्वजवंदन करून जनतेला मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले, ‘‘शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शाळांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. देवराज अर्स यांनी म्हैसूर राज्याचे ‘कर्नाटक’ असे नामकरण करून ५० वर्षे झाली. कन्नडमध्ये व्यवहार करण्याचा संकल्प करून मातृभूमीचे ऋण फेडूया.’’

कर्नाटकाची अधिकृत भाषा कन्नड आहे. त्यामुळे कन्नडमध्येच व्यवहार करावा लागतो. आपण प्रत्येकाचा आणि प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे. पण कन्नडचाही वापर व्हायला हवा. प्रत्येक अधिकाऱ्याने न चुकता याचे पालन करावे. कर्नाटकमध्ये केवळ इंग्रजी आणि हिंदीमध्ये स्पर्धा परीक्षा देता येते. यापूर्वीही मी कन्नडमधून स्पर्धा परीक्षा घेण्याचा आग्रह धरला होता. गरज भासल्यास केंद्राला पुन्हा पत्र लिहून मागणी करु. आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय पालकांच्या निर्णयावर सोडला जातो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मात्र, मातृभाषेतील माध्यमात शिकणे, हे अत्यंत शास्त्रशुद्ध आहे, हे समजून घेतले पाहिजे. कन्नड ही शिकण्याची भाषा झाली पाहिजे. अलीकडे अधिक मुले खासगी शाळांमध्ये शिकत आहेत, हा वाढता धोका आहे. कन्नडमध्ये अभ्यास केल्याने स्मार्ट होणार नाही, असे म्हणणारे बरेच लोक आहेत. कन्नड माध्यमात शिकलेले अनेक शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध आहेत. फक्त इंग्रजी माध्यमातच शिक्षण घेणे हा गैरसमज आहे. मुलांनी कोणती भाषा शिकायची, हे पालकांनी ठरवायचे आहे. कन्नड भाषेतच शिकण्याचा निर्णय पालकांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले, राज्योत्सवाचा ५० वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. कन्नड ही अधिकृत भाषा असल्याचे घोषित केले आहे. शिक्षण विभागाने १३ हजार शिक्षकांची भरती केली आहे. दोन हजार शाळा बांधण्याचे उद्दिष्ट आहे. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तीन वेळा प्राथमिक परीक्षा घेतली जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, आमदार रिजवान हर्षद यांचीही यावेळी भाषणे झाली.

इंग्लिश कॉन्व्हेंटचा मोह टाळा

कन्नडमध्ये शिक्षण घेतल्यास नोकरी मिळणार नाही, ज्ञान मिळवता येणार नाही, अशा गैरसमजाने इंग्लिश कॉन्व्हेंटचा मोह वाढला आहे. हे योग्य नाही. कन्नड माध्यमात शिकलेले लोक समाजाच्या सर्व क्षेत्रात उच्चपदांवर विराजमान आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT