CM Siddaramaiah vs Narendra Modi esakal
देश

CM Siddaramaiah : ISRO च्या कामगिरीत मोदींचं काय योगदान? मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना थेट सवाल

विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) हादरायला लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचनांमुळे विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

बंगळूर : विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) हादरायला लागले आहे. त्या एकजुटीची भीती वाटत आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी ट्विटच्या मालिकेद्वारे फटकारले आहे.

ते म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कुशासनाचा अंत करण्याच्या दिशेने मुंबईत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या तिसऱ्या महत्त्वाच्या बैठकीने एक मोठे पाऊल उचलले. आघाडीचे नेतृत्व प्रभावीपणे करण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली असून लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या संदर्भात नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाण्यासाठी पावले उचलली आहेत, हे स्वागतार्ह आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचनांमुळे विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. केंद्र सरकारची जनविरोधी भूमिका, उद्योगपतींच्या संगनमताने होणारी लूट आदींबाबत भाजप नेत्यांकडे उत्तरे नाहीत. उद्योगपती मित्र अदानी आणि त्यांच्या कंपनीवर अनियमिततेचे जागतिक आरोप असतानाही मोदी स्वतः अदानींच्या बचावासाठी पुढे आले आहेत, असेही त्यांनी सांगितलं.

अदानी संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, या विरोधकांच्या मागणीची मोदींना जाणीव आहे. महागाई, बेरोजगारी, कर्जावरील व्याजदरात वाढ, जातीय द्वेष, हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती आदी ज्वलंत समस्यांवर तोडगा काढता न आल्याने ‘मोदी अँड कंपनी’ने खोटे झाकण्यासाठी लोकांचे लक्ष विचलित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर अनावश्यक चर्चा करून ज्वलंत प्रश्न लपवण्याचे काम मोदींनी सुरू केल्याचंही सिद्धरामय्या म्हणाले.

इस्रोच्या कामगिरीत मोदींचे योगदान काय?

इस्रोच्या यशाचा उल्लेख करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मोदी हे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला आपले कर्तृत्व म्हणून चित्रित करण्याच्या पातळीपर्यंत पोचले आहेत, हे केवळ खेदजनकच नाही, तर निंदनीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT