Siddaramaiah officially ends the suspense over Karnataka’s Chief Minister post during a public statement, clarifying Congress's leadership stance.  sakal
देश

Karnataka CM suspense : कर्नाटक मुख्यमंत्रिपदाबाबत आता खुद्द सिद्धरामय्यांनीच केलं मोठं विधान, म्हणाले..

Siddaramaiah ends Karnataka CM suspense - मुख्यंमंत्रिपदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय नाट्य पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मौन सोडलं आहे

Mayur Ratnaparkhe

Siddaramaiah Breaks Silence on CM Position - कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण, खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच हा सस्पेन्स आता संपवला आहे. मीच पाच पूर्ण पाच वर्षे कर्नाटकचा मुख्यमंत्री राहणार आहे आणि यामध्ये काहीच शंका नसावी, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच, सिद्धरामय्या यांनी दावा केला की काँग्रेस पक्षात एकजुट आहे आणि हे सरकार पाच वर्षांपर्यंत पहाडाप्रमाणे भक्कम राहील. मीडिया प्रतिनिधींनी जेव्हा त्यांना विचारणा केली की, तुम्हीच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर कायम रहाल का? तर सिद्धरामय्या यांनी स्पष्टपणे सांगितले की, होय मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहील. यामध्ये काहीच शंका नाही. तुम्हाला शंका का आहे? तिकडे डीके शिवकुमार यांनीही सांगितले की पक्षात कोणत्याही प्रकारचा असंतोष नाही.

 मागील काही दिवसांमध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याबाबत नवीन उलसुलट चर्चा सुरू होत्या. सत्ता वाटपाच्या चर्चेचा हवाला देत असा अंदाज वर्तवला जात होता की, कर्नाटकात मुख्यंत्रिपदाचा चेहरा लवकरच बदलणार आहे. शिवाय, काँग्रेसमधीलच काही आमदारांनीही अशाचप्रकारची स्पष्ट विधानं केल्याचे दिसून आले होते.

मात्र उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंगळवारीच स्पष्ट केले की, नेतृत्व बदलाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाला बळकट करण्याचे आवाहन केले. शिवाय, हे देखील सांगितले की पक्षात असंतोष असल्याच्या बातम्या निराधार आहेत.

त्यानंतर आता भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या दाव्यावंर खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच पलटवार केला. म्हटले, ते आमचे हायकमांड आहेत का? आर अशोक(विधानसभा विरोधीपक्ष नेते) भाजपचे आहेत. बी वाय विजयेंद्र(भाजप प्रदेशाध्यक्ष) भाजपचे आहेत अन् चालावाडी नारायणस्वामी(विधानपरिषद विरोधीपक्ष नेते) भाजपचेच आहेत. जर ते अशाप्रकारे काही बोलत असतील तर तुम्ही तेच लिहिणार का? तुम्ही खात्री केली पाहिजे की नाही?

याशिवाय, सरकार अस्थिर असल्याचं खोटं भाजपकडून पसरवलं जात आहे, असं सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले की काँग्रेस पक्ष एकत्र आहे आणि सरकार पाच वर्षे पहाडाप्रमाणे भक्कम राहील. तसेच, त्यांनी हेही सांगितले की, सत्तेत असताना भाजपने काहीच केलेले नाही. त्यामुळे ते आता खोटं पसरवून सर्वसामान्यांना गोंधळून टाकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT