Dhruv Narayan Passed Away esakal
देश

Congress : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं गमावला बडा नेता; ध्रुव नारायण यांचं Heart Attack नं निधन

डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉ. मंजुनाथ यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dhruv Narayan Passed Away : कर्नाटकातील काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष ध्रुव नारायण (Dhruva Narayan) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉ. मंजुनाथ यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. नारायण यांना छातीत दुखू लागलं, तेव्हा त्यांच्या ड्रायव्हरनं त्यांना सकाळी 6.40 वाजता रुग्णालयात दाखल केलं. पण, त्यांना वाचवता आलं नाही.

KPCC कार्याध्यक्ष आर ध्रुव नारायण यांचं आज म्हैसूर (Mysore) इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. चामराजनगरमधून ते दोन वेळा खासदार राहिले आहेत. ध्रुव नारायण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

प्रभावशाली दलित नेता

ध्रुव नारायण हे जुन्या म्हैसूरचे प्रभावी दलित नेते होते. तसेच, ते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जवळचे मित्र होते. निवडणुकीच्या काळात ते चामराजनगरमधील मोठे नेते मानले जात होते. ध्रुव नारायण यांनी दोन वेळा खासदार आणि आमदार म्हणूनही काम केलं आहे. यावेळी ते नांजनगुडू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. दरम्यान, खासदार प्रताप सिंह यांनी ध्रुव नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रताप सिंह यांनी लिहिलंय, 'देवानं अशा चांगल्या व्यक्तीला हिरावून घेतलं...ओम शांती!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT