Karnataka Minister on Moral Science Google
देश

हिंदू नव्हे तर सर्वांसाठी भगवद्‌गीता, शाळेत लवकरच मूल्यशिक्षण : कर्नाटक मंत्री

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : कर्नाटकमध्ये नुकताच हिजाब वाद रंगला होता. विद्यार्थिनींनी हिजाब घातल्याशिवाय शाळा-महाविद्यालयांमध्ये येणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर आता कर्नाटक सरकार (Karnataka Government) पुढच्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये मूल्यशिक्षण (Moral Science) सुरू करण्याचा विचार करत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनी (Karnataka Educational Minister) म्हटलं आहे.

यापूर्वी आम्ही शाळांमध्ये मूल्यशिक्षण शिकवित होतो. पण, काही वर्षांपासून ते बंद आहे. आता काही पालकांना वाटतं की शाळेमध्ये पुन्हा मूल्यशिक्षणाचे धडे शिकवावे. आम्ही सध्या विचार केलेला नाही. पण, भविष्यात नक्कीच आम्ही मूल्यशिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करू. मूल्यशिक्षणात कोणते विषय असतील याबाबत शिक्षणतज्ज्ञ निर्णय घेतील, असं ते म्हणाले.

'हिंदू नव्हे, तर सर्वांसाठी भगवद्‌गीता' -

मूल्यशिक्षण सुरू करण्यासाठी आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. त्यांच्यासोबत सल्लामसलत करून आम्ही पुढील शैक्षणिक सत्रापासून शाळांमध्ये मूल्यशिक्षणाचा समावेश करू. विद्यार्थ्यांवर कोणत्या गोष्टींचा कसा परिणाम होतो, हे ठरवले जाईल. यामध्ये भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यापैकी कशाचाही समावेश असू शकतो. भगवद्‌गीता फक्त हिंदू नव्हे तर सर्वांसाठी बंधनकारक असेल. शिक्षणतज्ज्ञांनी होकार दिल्यास आम्ही पुढच्या सत्रापासून नक्की मूल्यशिक्षण सुरू करू, असं कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले.

गुजरातमध्ये देखील बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात भगवद्‌गीतेचा समावेश करण्यात आला आहे. आता शाळांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना भगवद्‌गीतेचं शिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर कर्नाटक सरकार हे अभ्यासक्रमात आणण्याचा विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Live Update: जोबिन जोसेफ यांची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नवी दिल्ली येथील कार्यालयात 'वैयक्तिक प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT