Karnataka Cattle Death
Karnataka Cattle Death esakal
देश

JDS च्या निवडणूक रॅलीनंतर फेकलेलं अन्न खाल्ल्यामुळं पोट फुगून 15 गायींचा मृत्यू; 20 वर उपचार सुरु

सकाळ डिजिटल टीम

नावरं चारा खाऊन स्वतःहून घरी परततील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. पण, जेडीएसच्या रॅलीनंतर 30-35 गायी शेतात टाकलेलं अन्न खाल्या आणि त्या दुसऱ्या दिवशीपर्यंत घरी परतल्या नाहीत.

Karnataka Cattle Death : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील (Karnataka Yadgir) येरागल गावात अन्नातून विषबाधा होऊन 15 गायींचा (Cow) मृत्यू झाला आहे.

जेडीएसच्या रॅलीनंतर टाकाऊ अन्न खाल्ल्यामुळं ह्या गायी आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 24 मार्चला जनता दल सेक्युलरनं (JDS) गुरुमितकल मतदारसंघात पक्षाचे उमेदवार शरणागौडा कंडाकूर (Sharanagouda Kandkur) यांच्या समर्थनार्थ पंचरत्न यात्रा सुरू केली होती.

शेतात टाकला शिजलेला भात

या पदयात्रेत मोठ्या संख्येनं समर्थक सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर याठिकाणी लोकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर वाया जाणारं अन्न जवळच्या शेतात टाकण्यात आलं होतं. सहसा येथील शेतकरी जनावरांना चरण्यासाठी शेतात मोकळे सोडतात आणि गायी चरल्यानंतर संध्याकाळी त्यांना आपल्या आश्रयाला परत आणतात.

35 गायींनी खाल्लं अन्न

जनावरं चारा खाऊन स्वतःहून घरी परततील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. पण, जेडीएसच्या रॅलीनंतर 30-35 गायी शेतात टाकलेलं अन्न खाल्या आणि त्या दुसऱ्या दिवशीपर्यंत घरी परतल्या नाहीत. शिजलेला भात मोठ्या प्रमाणात शेतात टाकण्यात आला होता. त्यानंतर काही स्थानिकांच्या लक्षात आलं की, गायींचं पोट फुगलं आहे. त्यांनी याबाबतची माहिती प्राधिकरणाला दिली.

15 गायींचा मृत्यू, 20 वर उपचार सुरू

टाईम्स ऑफ इंडियानं पशुसंवर्धन विभागाचे संचालक राजू देशमुख यांच्या हवाल्यानं सांगितलं की, याबाबतची माहिती मिळताच ते गावात पोहोचले आणि जनावरांची तपासणी केली. या दुर्घटनेत 9 गायींचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं. नंतर नमुने शवविच्छेदनासाठी पाठवले असता अन्नातून विषबाधा झाल्यामुळं गायींचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. प्रत्येक गायीनं किमान 5-6 किलो भात खाल्ला असावा, असा अंदाज व्यक्त केला. 6 गायींवर उपचार सुरू होते. मात्र, त्यांचाही मृत्यू झाला. याशिवाय 20 गायींवर उपचार सुरू असून त्या धोक्याबाहेर आहेत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT